US Election 2020 LIVE : डोनाल्ड ट्रम्प यांना 214 तर जो बायडन यांना 264 मतं, बायडन विजयाच्या उंबरठ्यावर

संपूर्ण जगाचं लक्ष सध्या अमेरिकेच्या 46 व्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक निकालाकडे लागलं आहे. रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार?, की डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन इतिहास घडवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (US Election result live)

US Election 2020 LIVE : डोनाल्ड ट्रम्प यांना 214 तर जो बायडन यांना 264 मतं, बायडन विजयाच्या उंबरठ्यावर
Follow us
| Updated on: Nov 05, 2020 | 11:33 AM

अमेरिकन अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे (US Presidential Election 2020) अंतिम निकालाचं चित्र स्पष्ट  होत आहे. कालपासून सुरु असलेल्या मतमोजणीनंतर आता निकालाचं चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे. डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन हे विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे. बायडन यांनी विस्कॉन्सिन आणि मिशिगनसारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये विजय मिळवला आहे. विजयासाठी 270 इलेक्ट्रोल व्होट्सची गरज आहे, तर बायडन यांनी आतापर्यंत 264 इलेक्ट्रोल व्होट्स मिळवले आहेत. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 214 इलेक्ट्रोल व्होट्स मिळाले आहेत. (US Election Live Result Update)

[svt-event title=”जो बायडन विजयाच्या दिशेने, भारतीय शेअर बाजार 500 अंकांनी वधारला ” date=”05/11/2020,11:29AM” class=”svt-cd-green” ] जो बायडन यांची विजयाच्या दिशेने आगेकूच सुरू असल्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला आहे. शेअर बाजार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्सनं 500 अंकाची वाढ होत 41 हजारांच्या टप्पा ओलांडला. [/svt-event]

[svt-event title=”तमिळनाडूत कमला हॅरीस यांच्यासाठी पोस्टर्स” date=”05/11/2020,9:48AM” class=”svt-cd-green” ] तमिळनाडू येथील थुलासेंद्रापूर येथे कमला हॅरीस यांच्या विजयाची कामना करणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांचे मूळ कुटुंब याच गावचे आहे. कमला हॅरीस उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार आहेत. [/svt-event]

[svt-event title=”पेन्सिलव्हेनियात मतमोजणीदरम्यान घोटाळा : ज्युनियर ट्रम्प” date=”05/11/2020,9:23AM” class=”svt-cd-green” ] अमेरिकन अध्यक्षपद निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान घोटाळा झाल्याचा आरोप विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने करत आहेत. आता ट्रम्प यांचा मुलगा ज्युनियर ट्रम्प यांनीदेखी असाच आरोप केला आहे. ज्युनियर ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेत आरोप केला आहे की, पेन्सिलव्हेनियात मतमोजणीदरम्यान घोटाळा झाला आहे. [/svt-event]

[svt-event title=”आमचं प्रशासन पुढील 77 दिवसात पॅरिस करारात सहभागी होईल : बायडन” date=”05/11/2020,8:30AM” class=”svt-cd-green” ] मतमोजणीदरम्यान जो बायडन यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे. पॅरिस करारातून बाहेर पडणाऱ्या ट्रम्प प्रशासनावर बायडन यांनी टीका केली आहे. तसेच बायडन म्हणाले की, आज ट्रम्प प्रशासन अधिकृतपणे पॅरिस पर्यावरण करारातून बाहेर पडलं आहे. आमचं प्रशासन पुढील 77 दिवसांमध्ये पुन्हा या करारात सहभागी होईल.

[svt-event title=”मिशिगन, न्यू जर्सी आणि न्यूयॉर्कमध्ये बायडन विजयी” date=”05/11/2020,8:35AM” class=”svt-cd-green” ] न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार माजी उपराष्ट्राध्यक्ष बायडन यांनी कोलोरॅडो, कनेक्टिकट, डेलावेयर, इलिनोइस, मेसाचुसेट्स, न्यू मेक्सिको, वरमोन्ट आणि वर्जिनियामध्ये विजय मिळवला आहे. तसेच महत्त्वाचं म्हणजे बायडन यांनी मिशिगन, विस्कॉन्सिन, न्यू जर्सी आणि न्यूयॉर्कमध्येदेखील विजय मिळवला आहे. न्यूयॉर्कमध्ये बायडन यांना 22 लाख मतं तर ट्रम्प यांना 12 लाख मतं मिळाली आहेत. [/svt-event]

[/svt-event]

[svt-event title=”जॉर्जियामधील मतमोजणी रोखण्यासाठी ट्रम्प यांचे प्रयत्न” date=”05/11/2020,6:32AM” class=”svt-cd-green” ] US मीडियाच्या रिपोर्टनुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी जॉर्जियामध्ये मतमोजणी रोखण्यासाठी याचिका दाखल केली आहे. [/svt-event]

[svt-event title=”पेन्सिलव्हेनियामधील निकाल अद्याप बाकी” date=”05/11/2020,6:36AM” class=”svt-cd-green” ] विजयासाठी 270 इलेक्ट्रोल व्होट्सची गरज असताना बायडन यांना आतापर्यंत 264 इलेक्ट्रोल व्होट्स मिळले आहेत. तर विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 214 इलेक्ट्रोल व्होट्स मिळाले आहेत. त्यामुळे बायडन विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र त्यांचा विजय अद्याप निश्चित नाही, कारण, अद्याप नेवादा आणि पेन्सिलव्हेनियासारख्या महत्त्वाच्या राज्यांमधील निकाल समोर आलेले नाहीत. या दोन्ही राज्यांमधील निकाल दोन्ही नेत्यांच्या भवितव्याचा फैसला करणार आहेत. [/svt-event]

[svt-event title=”मतमोजणीदरम्यान गोंधळ; ट्रम्प यांचा आक्षेप” date=”05/11/2020,6:43AM” class=”svt-cd-green” ] मतमोजणीदरम्यान गोंधळ सुरु असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. त्यांनी याबाबत ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, सर्वत्र बायडन यांनाच मतं मिळत असल्याचे दिसत आहे. पेन्सिलव्हेनिया, विस्कॉन्सिन किंवा मिशिगन, सर्वत्र तेच सुरु आहे. ही बाब देशासाठी अत्यंत वाईट आहे. ट्रम्प यांनी अजून एका ट्विटमध्ये याबाबत उल्लेख केला होता. परंतु ट्विटरने या ट्विटरवर वादग्रस्त असे मार्क केले आहे.

[/svt-event]

निकालापूर्वी डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध जो बायडन ट्विटर वॉर

मतमोजणी सुरु असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत:ला विजयी घोषित केले. त्यानंतर त्यांनी अमेरिकन जनतेचे आभार मानले. ट्रम्प यांनी बायडन यांना ‘फ्रॉड’ म्हणले यांच्यावर टीकास्त्र सोडले. मतमोजणी थांबवण्याची मागणी करत सुप्रीम कोर्टात जाणाच्या इशारा ट्रम्प यांनी दिला.

जो बायडन यांच्या प्रचार अभियानाकडून ट्रम्प यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. जर ट्रम्प मतमोजणी थांबवणार असतील तर आम्ही देखील सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी सज्ज आहोत, असा इशारा बायडन यांच्या टीमनं दिला. मतमोजणी सुरु असताना विजयाची घोषणा केल्यामुळे फेसबूक आणि ट्विटरनं डोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार झटका दिला.

[svt-event title=”फेसबूक,ट्विटरचा दोन्ही पक्षांना इशारा, चुकीची माहिती पसरवू नका” date=”04/11/2020,8:23PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”जो बायडन मिशिगनमध्ये प्रथमच आघाडीवर, स्विंग स्टेटसमध्ये बायडन यांना दिलासा ” date=”04/11/2020,8:17PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”जो बायडन यांचा मेकओव्हर, मिशिगन, नेवादा, विस्कॉन्सिनमध्ये आघाडी” date=”04/11/2020,8:09PM” class=”svt-cd-green” ] जो बायडन यांनी विस्कॉन्सिन,मिशिगन आणि नेवादा या स्विंग स्टेटसमध्ये मध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. बायडन यांची ही आघाडी कायम राहिल्यास डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढू शकतात. [/svt-event]

[svt-event title=”जो बायडन यांची मिशिगनमध्ये आघाडी” date=”04/11/2020,7:52PM” class=”svt-cd-green” ] जो बायडन यांनी विस्कॉन्सिन पाठोपाठ मिशिगनमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. बायडन यांनी मिशिगनमध्ये आघाडी मिळवत डोनाल्ड ट्रम्प यांना पिछाडीवर टाकले आहे. [/svt-event]

[svt-event title=”जो बायडन यांची विस्कॉन्सिनमध्ये आघाडी कायम” date=”04/11/2020,7:26PM” class=”svt-cd-green” ] जो बायडन यांनी विस्कॉन्सिनमध्ये ट्रम्प यांना पिछाडीवर टाकत मिळवलेली आघाडी कायम आहे. या राज्यात 10 आहे. इलेक्ट्रोल वोटस आहेत. [/svt-event]

[svt-event title=” महत्वाच्या 7 राज्यांमधील चित्र अद्याप अस्पष्ट, ट्रम्प आणि बायडन यांच्यात जोरदार चुरस ” date=”04/11/2020,6:38PM” class=”svt-cd-green” ] अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील चुरस वाढत आहे. बायडन यांना 238 तर ट्र्म्प यांना 213 इलेक्ट्रोल व्होटस मिळाले आहेत. अलास्का,जॉर्जिया, मिशिगन, नेवाडा, नॉर्थ कॅरोलिना, विस्कॉन्सिन आणि पेन्सिल्वेनिया या राज्यांतील चित्र स्पष्ट झालेलं नाही. [/svt-event]

[svt-event title=”सिनेटमध्ये रिपब्लिक तर रिप्रेझेन्टेटिव्ह हाऊसमध्ये डेमोक्रेटस आघाडीवर” date=”04/11/2020,6:28PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=” प्रत्येक मत मोजले जाणार, मिशिगनच्या सचिवांची माहिती” date=”04/11/2020,6:10PM” class=”svt-cd-green” ] निवडणुकीतील कर्मचारी रात्रभर काम करतील आणि प्रत्येक मताची मोजणी केली जाईल, असे मिशिगनच्या सचिव बेन्सन यांनी म्हटलं आहे.

[/svt-event]

[svt-event title=”पैन्सिलवैनिया राज्य ठरणार किंगमेकर ” date=”04/11/2020,5:13PM” class=”svt-cd-green” ] अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना 213 तर जो बायडन यांना 238 इलेक्ट्रोल वोटस मिळाली आहेत.सध्या दोन्ही उमेदवारांमध्ये चुरस असून राष्ट्राध्यक्ष कोण असणार याच्या निर्णयात पैन्सिलवैनिया राज्य महत्वाची भूमिका बजावणार आहे. पैन्सिलवैनियामध्ये 20 इलेक्ट्रोल व्होटस असून सध्या या राज्यात डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर आहेत. [/svt-event]

[svt-event title=”अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोण रचणार इतिहास?” date=”04/11/2020,4:59PM” class=”svt-cd-green” ] संपूर्ण जगाचं लक्ष सध्या अमेरिकेच्या 46 राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक निकालाकडे (America Election result)लागलं आहे. रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार?, की डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन (Joe Biden) इतिहास घडवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मतदान पार पडल्यानंतर अमेरिकेच्या सर्व 50 राज्यांमध्ये मतमोजणी पार पडत आहे. (America election result 2020 live) [/svt-event]

[svt-event title=”मेलेनिया ट्रम्प यांच्या मायदेशातून डोनाल्ड ट्रम्प यांचं अभिनंदन” date=”04/11/2020,4:28PM” class=”svt-cd-green” ] अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. निकाल लागण्यापूर्वीच ट्रम्प यांनी विजयी झाल्याचे घोषित केले. यानंतर मेलेनिया ट्रम्प यांची मातृभूमी असणारा युरोपातील देश सोल्वेनियाचे पंतप्रधान जानेझ जान्सा यांनी ट्रम्प यांचे अभिनंदन केले आहे.

[/svt-event]

[svt-event title=”हवाईमध्ये जो बिडेन यांच्या विजयाची शक्यता” date=”04/11/2020,4:04PM” class=”svt-cd-green” ] हवाईमध्ये जो बिडेन यांच्या विजयाची शक्यता असून येथून त्यांना 4 इलेक्ट्रोल वोटस मिळणार आहेत.

[/svt-event]

[svt-event title=”डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेत घटनात्मक पेच निर्माण करण्याचा प्रयत्न, जर्मन मंत्र्यांचं व्यक्तव्य ” date=”04/11/2020,3:58PM” class=”svt-cd-green” ] राष्ट्राध्यक्षपदासाठी मतमोजणी सुरु असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळं अमेरिकेत स्फोटक परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा जर्मनीच्या संरक्षण मंत्री अ‌ॅनेग्रेट कॅरेनबाऊर यांनी दिला आहे. [/svt-event]

[svt-event title=”US Election 2020 Live Update: पैन्सिलवैनियात 10 लाख मंतांची मोजणी बाकी ” date=”04/11/2020,3:47PM” class=”svt-cd-green” ] पैन्सिलवैनियाचे गव्हर्नर टॉम वुल्फ यांनी अजून 10 लाख मतांची मोजणी करणं बाकी असल्याची माहिती दिली आहे. मतमोजणीत पक्षपात केला जाणार नाही. प्रत्येक मत मोजले जाईल, असं टॉम वुल्फ यांनी म्हटलं. [/svt-event]

[svt-event title=”जो बायडन विस्कोनसीमध्ये ट्रम्प यांना पिछाडीवर टाकत आघाडीवर ” date=”04/11/2020,3:29PM” class=”svt-cd-green” ] जो बायडन यांनी विस्कोनसीमध्ये ट्रम्प यांना पिछाडीवर टाकत आघाडी मिळवली आहे. बायडेन यांनी अरिझोनामध्ये विजय मिळवला तर नेवाडामध्येही बायडन आघाडीवर आहेत. [/svt-event]

[svt-event title=”डोनाल्ड ट्रम्प यांचं मतमोजणी थांबवण्याबद्दलचं वक्तव्य चुकीचं, बायडन यांच्या कार्यालयाचा आरोप ” date=”04/11/2020,3:12PM” class=”svt-cd-green” ] डोनाल्ड ट्रम्प यांनी मतमोजणी थांबवावी अशी मागणी करत सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता. मतमोजणी थांबवण्याच्या ट्रम्प यांच्या मागणीवर बायडन यांच्या प्रचार अभियानानं टीका केली आहे. ट्रम्प यांनी मतमोजणी थांबवण्यासाठी प्रयत्न केल्यास सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं बायडन यांच्या कायदेविषयक टीमनं बुधवारी सांगतिले होते. [/svt-event]

[svt-event title=”विजय सोपा असतो मात्र, पराभव पचवणं सोपा नसतं: डोनाल्ड ट्रम्प, रिट्रसचं ट्विट ” date=”04/11/2020,2:54PM” class=”svt-cd-green” ] विजयी झाल्याचा दावा केल्यानंतर रात्री भाषण करण्याचा विचार नसल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. विजय पचवणं सोप असते मात्र पराभव स्वीकारणं सोपं नसतं असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटल्याचे वृत्त रिट्रसनं दिलं आहे. [/svt-event]

[svt-event title=”अमेरिकेतील निकाल जाहीर न झालेल्या राज्यांतील स्थिती” date=”04/11/2020,2:44PM” class=”svt-cd-green” ] अमेरिकेतील निकाल जाहीर न झालेल्या राज्यांतील स्थिती डोनाल्ड ट्रम्प( पहिली आकडेवारी)  जो बायडन पैन्सिलवैनिया: 55.8 vs 43.1 मिशिगन : 52.2 vs 46.2 विस्कोन्सीन : 51.1 vs 47.4 जॉर्जिया : 50.5 vs 48.3 अरिझोना : 46.8 vs 80 उत्तर कॅरिलोना : 50.1 vs 48.7 अलास्का : 61.4 vs 34.7 [/svt-event]

[svt-event title=”डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचे भारतीय वंशाचे उमेदवार रिक मेहता पराभूत” date=”04/11/2020,2:33PM” class=”svt-cd-green” ] भारतीय वंशाचे रिक मेहता रिपब्लिक पक्षाकडून न्यूजर्सीमधून सिनेटसाठी निवडणूक लढवत होते. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. [/svt-event]

[svt-event title=”ट्विटर पाठोपाठ फेसबूकचा डोनाल्ड ट्रम्प यांना झटका, चुकीची माहिती पसरवत असल्याचा ठपका” date=”04/11/2020,1:43PM” class=”svt-cd-green” ] डोनाल्ड ट्रम्प यांनी विजयी झाल्याचा दावा ट्विटर आणि फेसबुकवर पोस्ट टाकून केला होता. ट्विटर आणि फेसबुकने ट्रम्प यांच्या पोस्टसोबत चुकीची माहिती पसरवली जातेय, अशी नोटिफिकेशन दिले आहे. [/svt-event]

[svt-event title=”72 वर्षानंतर अरिझोनामध्ये डेमोक्रॅटिकला विजयाची आशा” date=”04/11/2020,1:38PM” class=”svt-cd-green” ] जो बायडन यांनी अरिझोनामध्ये प्रचारावर जोर दिला होता. बायडन यांच्या प्रयत्नांना यश आल्यास अरिझोनामध्ये 1948 नंतर डेमोक्रॅटिकला विजय मिळण्याची शक्यता आहे. गेली 72 वर्ष अरिझोना रिपब्लिकचा गड राहिला आहे. [/svt-event]

[svt-event title=”भारतीय वंशाच्या चार जणांची हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हजमध्ये फेरनिवड ” date=”04/11/2020,1:34PM” class=”svt-cd-green” ] डेमोक्रॅटिक पक्षाकडून भारतीय वंशाचे डॉ.अमी बेरा, प्रमिला जयपाल, रो खन्ना, राजा कृष्णमूर्ती यांची फेरनिवड झाली आहे. [/svt-event]

[svt-event title=”अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांचा विजयाच्या मार्गावर असल्याचा दावा” date=”04/11/2020,1:18PM” class=”svt-cd-green” ] अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांचा विजयाच्या मार्गावर असल्याचा दावा केला आहे. [/svt-event]

[svt-event title=”डोनाल्ड ट्रम्प यांची सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची घोषणा” date=”04/11/2020,1:10PM” class=”svt-cd-green” ] अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार 4 वाजता नव्यानं मतपत्र आढळली आहेत. त्याविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. [/svt-event]

[svt-event title=”जो बायडन यांचा कॅलिफोर्नियामध्ये विजय” date=”04/11/2020,12:54PM” class=”svt-cd-green” ] जो बायडन न्यूयॉर्क, वेरमोंट, रोड आइलैंड, मैसाचुसेट्स, न्यू जर्सी, मैरीलैंड, न्यू मेक्सिको, कोलोराडो, कनेक्टिकट, वॉशिंगटन, ओरेगन, कैलिफोर्निया, इलिनोइस, हवाई आणि वर्जिनियामध्ये विजय मिळाला आहे, असं वृत्त एपी न्यूज या वृत्तसंस्थेने दिले आहे. [/svt-event]

[svt-event title=”विस्कॉन्सिन, मिशिगन आणि पेनसिल्व्हेनिया राज्यांच्या निकालवरुन ठरणार अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष ” date=”04/11/2020,12:36PM” class=”svt-cd-green” ] विस्कॉन्सिन, मिशिगन आणि पेनसिल्व्हेनिया राज्यांच्या निकालाकडे डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांचे लक्ष लागले आहे. या तीन राज्यांच्या निकालावर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा निकाल अवलंबून आहे. [/svt-event]

[svt-event title=”डोनाल्ड ट्रम्प यांचा जो बायडन यांच्यावर मतचोरीचा गंभीर आरोप” date=”04/11/2020,12:24PM” class=”svt-cd-green” ] डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडन यांच्यावर मतचोरी करत असल्याचा आरोप केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याबाबत ट्विट केले होते. ट्विटरकडून ते ट्विट ब्लॉक करण्यात आलय.

  [/svt-event]

[svt-event title=”टेक्सासमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय ” date=”04/11/2020,12:16PM” class=”svt-cd-green” ] डोनाल्ड ट्रम्प यांनी टेक्सासमध्ये विजय मिळवला आहे. टेक्सासमधील 38 इलेक्ट्रोल वोट्स ट्रम्प यांच्या पारड्यात गेली आहेत. टेक्सास राज्यातून नेहमी रिपब्लिक पक्षाला समर्थन मिळते. [/svt-event]

[svt-event title=”डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळवलेली राज्य” date=”04/11/2020,12:07PM” class=”svt-cd-green” ] एपी न्यूच्या वृत्तानुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी केंटकी, इंडियाना, ओकलाहोमा, टेनेसी, वेस्ट वर्जीनिया, नेब्रास्का, नॉर्थ और साउथ डाकोटा, यूटा, नेब्रास्का, लुइसियाना, साउथ कैरिलोना, अल्बामा, वायोमिंग, कंसास, मिसौरी, मिसिसिपी, ओहियो या राज्यांमध्ये विजय मिळवला आहे. [/svt-event]

[svt-event title=”जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा विजयाचा दावा” date=”04/11/2020,11:54AM” class=”svt-cd-green” ] जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत विजय मिळवण्याचा दावा केला आहे. तर, ट्रम्प यांनी जनतेला रात्री संबोधित करणार असल्याचे ट्विट केले आहे. [/svt-event]

[svt-event title=”US Election 2020 Live Update: बायडन यांचा विजयाचा दावा ” date=”04/11/2020,11:40AM” class=”svt-cd-green” ] आम्ही योग्य स्थितीत आहोत. निवडणुकीत विजय मिळवणार असल्याचा विश्वास जो बायडन यांनी व्यक्त केला. जो बायडन यांना 237 इलेक्ट्रोल वोटस मिळाले आहेत. तर ट्रम्प यांना 210 इलेक्ट्रोल वोटस मिळाले आहेत.

[/svt-event]

[svt-event title=”US Election 2020 Live Update: डोनाल्ड ट्रम्प यांची फ्लोरिडा आणि ओहियोमध्ये आघाडी” date=”04/11/2020,11:33AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मतमोजणी सुरु झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट” date=”04/11/2020,11:19AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”US Election 2020 Live Update: जॉर्जियामध्ये आघाडीवर असल्याचा जो बायडन यांचा दावा” date=”04/11/2020,11:16AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”US Election 2020 LIVE : जो बायडन बहुमताच्या दिशेने! 270 पैकी ट्रम्प यांना 210 तर जो बायडन यांना 237 मतं” date=”04/11/2020,11:03AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चुरशीची लढत” date=”04/11/2020,10:50AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”जो बायडन बहुमताच्या दिशेने! ट्रम्प यांना 204 तर जो बायडन यांना 227 मतं” date=”04/11/2020,10:42AM” class=”svt-cd-green” ] अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात लागण्याची शक्यता आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार जो बायडन हे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढे आहेत. बहुमतासाठी 270 मतांची गरज आहेत. आता जो बायडन यांना 227 तर ट्रम्प यांना 204 मतं मिळाली आहेत. मात्र, अजून राहिलेल्या मतमोजणीत काय होईल?, हे सांगता येत नाही. त्यामुळे संपूर्ण निकाल हाती आल्यानंतरच अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण होणार हे स्पष्ट होईल. [/svt-event]

[svt-event title=”डोनाल्ड ट्रम्प जो बायडनपेक्षा आघाडीवर” date=”04/11/2020,8:39AM” class=”svt-cd-green” ] हाती आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 50 राज्यांपैकी 22 राज्यांचे निकाल लागले आहेत. त्यापैकी 12 राज्यांमध्ये ट्रम्प तर 10 राज्यांमध्ये जो बायडन यांना विजय मिळाला आहे. [/svt-event]

[svt-event title=”दक्षिण दकोटा, उत्तर दकोटामध्ये डोनाल्ड्र ट्रम्प विजयी” date=”04/11/2020,8:47AM” class=”svt-cd-green” ] डोनाल्ट्र ट्रम्प यांचा दक्षिण दकोटा आणि उत्तर दकोटा राज्यात विजय झाला आहे. तर कोलोराडो आणि कनेक्टिकट राज्यात जो बायडन विजयी झाले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”5 राज्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प विजयी” date=”04/11/2020,7:30AM” class=”svt-cd-green” ] AP न्यूजने दिलेल्या माहितीनुसार केंटकी, इंडियाना, ओकलाहोम, टेनेसी आणि वेस्ट वर्जीनिया या राजांमध्ये विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांचा विजय झाला आहे. [/svt-event]

[svt-event title=”6 राज्यांमध्ये जो बायडन यांचा विजय” date=”04/11/2020,7:32AM” class=”svt-cd-green” ] वेरमोंट, रोड आयलँड, मैसाचुसेट्स, न्यू जर्सी, मेरिलँडमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन यांचा विजय झाला आहे. [/svt-event]

संबंधित बातम्या:

US Election 2020 : ट्रम्प आणि बायडन यांचं भवितव्य ‘या’ 12 राज्यांच्या हातात

US Election 2020 : अमेरिकेत निकालाच्या पार्श्वभूमीवर हिसेंची शक्यता, व्हाईट हाऊसचं रुपांतर तटबंदी किल्ल्यात

America election result 2020 live

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.