AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Joe Biden | जो बायडन यांच्या कॅबिनेटमध्ये बराक ओबामांच्या सहकाऱ्यांना महत्वाच्या पदांवर संधी

बायडन यांच्या कॅबिनेटमध्ये बराक ओबामा यांच्या सहकाऱ्यांचे वर्चस्व पाहायला मिळणार आहे. | Joe Biden Cabinet

Joe Biden | जो बायडन यांच्या कॅबिनेटमध्ये बराक ओबामांच्या सहकाऱ्यांना महत्वाच्या पदांवर संधी
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Nov 24, 2020 | 1:32 PM
Share

वॉशिंग्टन:  अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांनी  नवं सरकार बनवण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. जो बायडन नव्या सरकारचे कॅबिनेट बनवण्याचे काम करत आहेत. बायडन यांनी त्यांचे सहकारी एंटनी ब्लिकेन यांना परराष्ट्र मंत्री पदासाठी सूचित केले आहे. जेक सुलीवन यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नामनिर्देशित करण्यात आलेय. बायडन यांच्या कॅबिनेटमध्ये बराक ओबामा यांच्या सहकाऱ्यांचे वर्चस्व पाहायला मिळणार आहे. ओबामांच्या टीममधील 4 जण बायडन यांच्या टीमचे सदस्य असतील. (US President  Joe Biden preparing Cabinet for his tenure)

एंटनी ब्लिकेन यांनी बराक ओबामांच्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्रालयात उपमंत्री म्हणून काम केले आहे. उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. बायडन यांच्या प्रचार अभियानाच्या परराष्ट्र धोरणाचे ब्लिकेन सदस्य होते. बायडन यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात जेक सुलीवन त्यांचे सुरक्षा सल्लागार होते. हिलंरी क्लिंटन परराष्ट्र मंत्री होत्या त्यावेळी सुलीवन डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ म्हणून काम करत होते.

एवरिल एंस यांना गुप्तवार्ता विभागाची जबाबदारी

बायडन यांनी एवरिल एंस यांना राष्ट्रीय गुप्तवार्ता विभागच्या प्रमुख म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहे. गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख म्हणून संधी मिळणाऱ्या एवरिल एंस पहिल्या महिला आहेत. अमेरिकेच्या सीआयएमध्येही त्यांनी काम  केले आहे. (US President  Joe Biden preparing Cabinet for his tenure)

क्युबामध्ये जन्म झालेल्या वकील एलेजेंड्रो मेयकोरस यांना अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे. एलजेंड्रो मेयकोरस हे लॅटिन अमेरिकी नागरिक आहेत त्यांना अंतर्गत सुरक्षा विभागाची जबाबदारी मिळणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात प्रवासी नागरिकांबद्दल नियम अधिक कठोर बनवले गेले होते. मात्र, बायडन यांच्या काळात यामध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जातीय.

पर्यावरणीय बदलांबाबत महत्वाच्या पॅरिस समझोत्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या जॉन कॅरी यांना बायडन यांनी महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या काळात अमेरिका पॅरिस समझोत्यामधून बाहेर पडल्याचे जाहीर केले होते. बायडन यांनी जॉन कॅरी यांच्यावर पर्यावरणीय बदलांबाबत महत्वाची भूमिका सोपवली आहे. (US President  Joe Biden preparing Cabinet for his tenure)

लिंडा थॉमस ग्रीनफिल्ड यांना संयुक्त राष्ट्रांमधील अमेरिकेच्या राजदूत म्हणून निर्देशीत करण्यात आलं आहे. तर जेनेट येलेन यांना अमेरिकेच्या ट्रेजरी सचिवपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. जेनेट येलेन या 74 वर्षीय असून त्या बेरोजगारीच्या बाबतीत तज्ञ आहेत.

संबंधित बातम्या:

…अखेर डोनाल्ड ट्रम्प यांना पराभव मान्य, बायडन यांना सत्तास्थापनेसाठी निमंत्रण

Joe Biden | जो बायडन ‘कमजोर अध्यक्ष’, चीनच्या सरकारी सल्लागाराची टीका

(US President  Joe Biden preparing Cabinet for his tenure)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या