उपचारानंतर कोरोना मुक्त, फेसबुकवर महिलेची पोस्ट व्हायरल

अमेरिकेत फेब्रुवारीमध्ये एका महिलेला कोरोनाची लागण झाली (Corona survive Women share experience on facebook)  होती.

उपचारानंतर कोरोना मुक्त, फेसबुकवर महिलेची पोस्ट व्हायरल

वॉशिंग्टन : अमेरिकेत फेब्रुवारीमध्ये एका महिलेला कोरोनाची लागण झाली (Corona survive Women share experience on facebook)  होती. डॉक्टरांनी महिलेला तपासले असता कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह दाखवला होता. पण या भयंकर अशा आजारासोबत दोन हात करत ही महिला बरी झाली आहे. एलिझाबेथ शिंडेर असं या मिहलेचं नाव आहे. या आजारातून बरी झाल्यानंतर तिने फेसबुकवर आपला अनुभव शेअर (Corona survive Women share experience on facebook)  केला आहे.

एलिझाबेथची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत ही पोस्ट 27 हजार युझर्संनी शेअर केली आहे. तर 3500 युझर्संनी यावर कॉमेंट केली आहे.

फेसबुक पोस्टमध्ये एलिझाबेथने सांगितले, “मला COVID-19 झाला होता. ही पोस्ट लिहिण्यासाठी माझ्या मित्रांनी मला खूप प्रेरणा दिली. मी अपेक्षा करते ही पोस्ट तुम्हाला लढण्यासाठी शक्ती आणि माहिती देईल. मला या व्हायरसची लागण एका घरातील पार्टीमध्ये गेल्याने झाली होती. या पार्टीमध्ये कुणाला खोकला, शिंका आणि इतर आजाराचे लक्षण नव्हते. पण या पार्टीमधील 40 टक्के लोक आजारी पडले. माध्यमातून सतत हात धुण्यासाठी आणि या आजारापासून स्वत: चा बचाव करण्यासाठी सांगत होते. मी पण तसेच केले.”

या आजारापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला लोकांपासून लांब राहावे लागेल. तसेच प्रत्येकाच्या वयानुसार तुम्हाला वेगवेगळी कोरोनाची लक्षणे दिसतात. माझे बरेच मित्र ज्यांना कोरोना झालेला आहे. ते 40 च्या पुढे, 50 च्या पुढे आणि 30 वयाच्या जवळ होते. आपल्यासाठी कोरोनाचे लक्षणे डोकेदुखी, ताप, शरीर दुखणे, सांधे दुखी आणि थकवा, असं शिंडेरने सांगितले.

“सुरुवातीला मला ताप आला तेव्हा 103 डिग्री पर्यंत पोहोचलेला. नंतर तो कमी झाला. मला सर्दी झाली, गळा खवखवत होता, नाक बंद झाले होते. 10-16 दिवस ताप आला होता. पण सुरुवातीला मी तपासणी करण्यासाठी नकार दिला. पण नंतर सिए्टल फ्लू अभ्यासाद्वारे चाचणी केली. कोरोनाची लागण झाल्याचे सिद्ध झाल्यांनतर मी उपचार घेतले.”, असंही शिंडेरने सांगितले.

शिंडेर म्हणाली, “मी आता मोठे कार्यक्रम आणि गर्दीपासून लांब राहत आहे. मी जरी तुम्हाला दिसली तरी मी तुमच्याजवळ येऊ शकत नाही. मला रुग्णालयात दाखल केले नव्हते. कोरोनाची लागण झाल्यामुळे मी डॉक्टरांच्या जवळही गेली नव्हती. कारण मी स्वत:हून बरी होत होती. 60 पेक्षा अधिक वय असलेल्या नातेवाईकांपासून लांब राहा. या व्हायरसची मरण्याची शक्यता खूप कमी आहे.”

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI