भारत-अमेरिका एकत्र येऊन चीनचा विरोध करणार, अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नेत्याचे वक्तव्य

डेमोक्रॅटिकचे काँग्रेस सदस्य राजा कृष्णमुर्ती यांनी अमेरिका चीनविरुद्ध भारताच्या बाजूनं राहणार आहे, असं सांगितले. India USA

भारत-अमेरिका एकत्र येऊन चीनचा विरोध करणार, अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नेत्याचे वक्तव्य
Follow us
| Updated on: Nov 25, 2020 | 4:55 PM

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर जो बायडन कॅबिनेट जाहीर केले आहे. बायडन यांच्या मंत्रिमंडळातील परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिकेंन यानी भारतासोबत सहकार्य वाढवणार असल्याचे जाहीर केले आहे. अमेरिकेच्या सरकारची चीन विरोधातील भूमिका देखील त्यानी स्पष्ट केली. अमेरिकेच्या एका संसद सदस्याने भारत आणि चीन या दोन्ही देशांतील सीमावादावर चिंता व्यक्त केली आहे. (USA supports India and oppose china on lac border issue)

डेमोक्रॅटिक पक्षाचे काँग्रेस सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी मंगळवारी भारतीय सीमेवर चीनच्या अवैध बांधकामाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. राजा कृष्णमूर्ती यांनी अमेरिका सातत्यानं भारताच्या बाजूने उभं राहणार असल्याचे सांगितले. चिनी सरकारनं शांततेला धोका निर्माण होईल, असं कृत्य केल्यास आम्ही त्याचा विरोध करु, असेही कृष्णमूर्ती यांनी सांगितले. भारत आणि चीन यांच्या सैन्यात गलवान खोऱ्यात झटापटीनंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढले आहेत.

भारत आणि चीन यांच्यातील सीमेवर चीनकडून सुरु असलेल्या बांधकामांविषयी माहिती असून त्याबाबत चिंतीत आहे. चीनच्या बांधकामांबाबतच्या बातम्या खऱ्या असतील तर भारत आणि चीनमधील तणाव वाढेल, अशी शक्यता राजा कृष्णमूर्ती यांनी व्यक केली.

चीनने केलेल्या कृतीमुळं शांतता आणि स्थिरतेला धोका निर्माण होणार असेल तर आम्ही त्याचा विरोध करु, असं वक्तव्य राजा कृष्णमूर्ती यांनी केले. ते इलिनोईसमधून विजयी झाले आहेत. भारत-चीन सीमेची सॅटेलाईटवरुन काढल्यात आलेले फोटो पाहून त्यांनी मत मांडले आहे. (USA supports India and oppose china on lac border issue)

जो बायडन यांच्या कॅबिनेटमध्ये ओबामांच्या सहकाऱ्यांना संधी

बायडन यांच्या कॅबिनेटमध्ये बराक ओबामा यांच्या सहकाऱ्यांचे वर्चस्व पाहायला मिळणार आहे. ओबामांच्या टीममधील 4 जण बायडन यांच्या टीमचे सदस्य असतील.एंटनी ब्लिकेन यांनी बराक ओबामांच्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्रालयात उपमंत्री म्हणून काम केले आहे. उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. बायडन यांच्या प्रचार अभियानाच्या परराष्ट्र धोरणाचे ब्लिकेन सदस्य होते.

बायडन यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात जेक सुलीवन त्यांचे सुरक्षा सल्लागार होते. हिलंरी क्लिंटन परराष्ट्र मंत्री होत्या त्यावेळी सुलीवन डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ म्हणून काम करत होते.

संबंधित बातम्या: 

Joe Biden | जो बायडन यांच्या कॅबिनेटमध्ये बराक ओबामांच्या सहकाऱ्यांना महत्वाच्या पदांवर संधी

Joe Biden | जो बायडन ‘कमजोर अध्यक्ष’, चीनच्या सरकारी सल्लागाराची टीका

(USA supports India and oppose china on lac border issue)

Non Stop LIVE Update
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....
एसटी बँकेच्या संचालकपदाबाबत सदावर्ते दाम्पत्याला मोठा दणका
एसटी बँकेच्या संचालकपदाबाबत सदावर्ते दाम्पत्याला मोठा दणका.
दिल्ली गाजवणार मुंडेसाहेबांची लेक, कुठून आली तुतारी..,शिंदेंचा घणाघात
दिल्ली गाजवणार मुंडेसाहेबांची लेक, कुठून आली तुतारी..,शिंदेंचा घणाघात.
तुझी लायकी XXX...पवारांच्या कार्यकर्त्याला दादांच्या आमदारांची शिवीगाळ
तुझी लायकी XXX...पवारांच्या कार्यकर्त्याला दादांच्या आमदारांची शिवीगाळ.
मतदानावेळी ताई दादांच्या घरी? दादांच्या बंगल्यावर ताई का आल्या?
मतदानावेळी ताई दादांच्या घरी? दादांच्या बंगल्यावर ताई का आल्या?.
महाराष्ट्रात कुठं किती टक्के मतदान? कुठ झाली कमाल तर कुठं वाढल टेन्शन?
महाराष्ट्रात कुठं किती टक्के मतदान? कुठ झाली कमाल तर कुठं वाढल टेन्शन?.
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.