AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॅलो, तुमच्या बंद पडलेल्या विमा पॉलिसीचे पैसे मिळवून देतो, लाखोंचा गंडा घालणारी टोळी जेरबंद!

फसवणूक करणाऱ्या टोळीला चंद्रपूर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील तीनही आरोपी हे पूर्वीचे इन्शुरन्स एजंट (Fake Insurance agents arrested) आहेत.

हॅलो, तुमच्या बंद पडलेल्या विमा पॉलिसीचे पैसे मिळवून देतो, लाखोंचा गंडा घालणारी टोळी जेरबंद!
| Updated on: Feb 20, 2020 | 11:29 AM
Share

चंद्रपूर : बंद पडलेल्या इन्शुरन्स पॉलिसीतून लाभ मिळवून देण्याचा बहाण्याने,फसवणूक करणाऱ्या उत्तर प्रदेशच्या पांढरपेशा ठक टोळीला चंद्रपूर पोलिसांनी अटक केली. अटकेतील तीनही आरोपी हे पूर्वीचे इन्शुरन्स एजंट (Chandrapur Insurance policy loot) आहेत. आधीच चोरलेल्या डेटाचा वापर करत बंद झालेल्या पॉलिसीबाबत (Chandrapur Insurance policy loot) टार्गेट करुन हे विमाधारकांना फोन करुन माहिती घेत होते. या टोळीने चंद्रपुरातील एका विमाधारकाचे तब्बल 48 लाख रुपयांना लुबाडले होते. आरोपींकडून बनावट आधार, पॅन आणि विविध बँकांचे पासबुक जप्त करण्यात आले आहेत. ठक टोळीतील म्होरक्यासह 2 आरोपी अद्याप फरार आहेत.

कधीकाळी एखाद्या विमा कंपनीकडून तुम्ही आपली पॉलिसी काढली असेल आणि ती हप्ता न भरल्याने बंद पडली असेल. तर ती सुरू करण्यात फायदा आहे असे फोन तुम्हाला येत असतील. मात्र त्यावर अंध विश्वास ठेवणं धोक्याचं ठरु शकतं.

अशा बंद पडलेल्या विमा पॉलिसीधारकाला लक्ष्य करुन काही पांढरपेशे ठक नागरिकांना कोट्यवधींना गंडा घालत आहेत. चंद्रपूर पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखा पथकाने उत्तर प्रदेशातून अटक केलेल्या एका टोळीची ही कथा चक्रावणारी ठरली आहे.

इन्शुरन्स कंपनीत काम करणारे काही पूर्वीचे एजंट चोरलेल्या डेटाचा वापर करून अशा रक्कम फसलेल्या पॉलिसीधारकाला लक्ष्य करत आहेत. एक-दोन नव्हे तर तब्बल डझनभर वेळा कॉल करुन ते तुमचा विश्वास संपादन करतात. तुमच्या पॉलिसीचे पैसे मिळवून देतो, तुमचे डिटेल्स द्या, तसंच त्यासाठी फी म्हणून ठराविक रक्कम द्या, अशी मागणी करुन लुबाडायचे. रक्कम फसल्याची अपराधी भावना असल्याने पॉलिसीधारक देखील निमूटपणे सांगितलेली रक्कम ऑनलाईन किंवा चक्क रोख स्वरूपात सांगितलेल्या खात्यात जमा करत होते.

चंद्रपूरच्या एका फिर्यादीला या टोळीने चक्क 48 लाख रुपयांनी गंडा घातला आहे. उत्तर प्रदेशातून कार्यरत असलेल्या या टोळीने संपूर्ण भारतात अनेकांना कोट्यवधी रुपयांनी फसविले आहे. यासाठी वापरले जाणारे बँक खाते देखील बनावट कागदपत्र- पॅन कार्ड- आधार कार्डद्वारे तयार केले गेले आहे.

केवळ फोन कॉलचा वापर, तुम्हीच दिलेल्या माहितीचा इमोशनल अत्याचार आणि सोबत आपसूकपणे ट्रान्सफर केलेली लाखोंची रक्कम या सर्व टोळी सदस्यांना फायद्याची ठरत आहे. सुमारे 10 हजार किलोमीटरचा प्रवास-दीड महिन्यांची अविश्रांत मेहनत आणि किचकट कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत चंद्रपूर पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखा पथकाने देशात पहिल्यांदाच या आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

सध्यातरी आरोपींच्या सर्व खात्यातील रक्कम उलाढालीचा विचार केला तर फसवणुकीची रक्कम 1 कोटी 80 लाखांच्या घरात पोहोचली आहे. या प्रकरणातील कुलदीप उर्फ राजकुमार वालिया उर्फ मल्होत्रा उर्फ बनवारीलाल शर्मा वय 28 वर्षे, रा. उपाध्याय मोहल्ला, खैर जिल्हा अलिगढ, उत्तर प्रदेश (2) दिपसिंह उर्फ दिपु उर्फ ओबेरॉय मनवीरसिंह वय 30 वर्षे रा. ग्राम अलीपुर गिजौरी, बुलंदशहर राज्य उत्तर प्रदेश, (3) उसवन उर्फ अभय उरफ रमन भोपाल सिंह वय 33 वर्षे, शास्त्री नगर, मेरठ राज्य उत्तर प्रदेश यांना 19 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यातील म्होरक्या आणि एक सदस्य सध्या फरार आहेत.

ज्येष्ठ नागरिक, महिला अथवा बंद पडलेला पॉलिसीधारक अशा विशिष्ट वर्गाला लक्ष्य करत त्यांना सातत्याने फोन कॉल करुन ही इन्शुरन्सद्वारे गंडा घालणारी टोळी आपला कार्यभाग साधायची. त्यामुळे इन्शुरन्स अथवा रक्कम गुंतवण्याची कुठलीही स्कीम सांगणारा कॉल अत्यंत काळजीपूर्वक हाताळण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. अशा गुन्ह्यांमध्ये आरोपी- बँक खाते अथवा त्याच्याशी निगडीत सर्व कागदपत्रे बनावट असल्याने या आरोपींपर्यंत पोहोचणे आणि त्यांना न्यायालयासमोर उभे करणे जिकिरीचे ठरत आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.