PHOTO : गुजरातच्या पुरात 45 दिवसाच्या बाळाला वाचवण्यासाठी धावून आलेले ‘वासूदेव’

- गुजरातमधील वडोदरा शहरात मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. अनेक लोकांच्या घरात पाणी साठल्याने मगरी शिरल्याच्याही घटना घडल्या आहेत.
- शहरात पाणी साठल्याने पोलिसांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. या बचावकार्यादरम्यान पोलिसांनी एका लहान बाळाला टबमध्ये टाकून त्याला त्यातून सुरक्षितरित्या वाचवले
- आयपीएस शमशेर सिंह यांनी याबाबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. बचावकार्यादरम्यान वाचवण्यात आलेले बाळ 45 दिवसांचे आहे.
- या बाळाला वाचवणाऱ्या पोलिसांचे नाव गोविंद चावडा असे आहे.
- गोविंद यांच्या मानेपर्यंत पाणी असतानाही त्यांनी त्या बाळाला वाचवण्याचे साहसी कार्य केले.
- त्यांच्या या साहसीवृत्तीचे अनेकांनी कौतुक केले आहे.
- वडोदरामध्ये 31 जुलैपासून ते 1 ऑगस्टपर्यंत 24 तासात 499 मिमी पावसाची नोंद करण्यात आली.







