दिवेघाटात वारकऱ्यांच्या दिंडीत जेसीबी घुसला, संत नामदेवांच्या वंशजासह दोघांचा मृत्यू

पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने जात असणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत (Dindi accident in Dive Ghat) दिवे घाट येथे एक जेसीबी घुसल्याने भीषण अपघात झाला.

दिवेघाटात वारकऱ्यांच्या दिंडीत जेसीबी घुसला, संत नामदेवांच्या वंशजासह दोघांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Nov 19, 2019 | 12:16 PM

पुणे : पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने जात असणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत (Dindi accident in Dive Ghat) एक जेसीबी घुसल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये (Dindi accident in Dive Ghat) दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला, तर जवळपास 15 वारकरी जखमी झाले. दिवेघाट येथे हा अपघात झाला. जखमींमध्ये एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर हडपसरमधील नोबल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये संत नामदेव महाराज यांच्या 17 व्या वंशजांचाही समावेश आहे. त्यामुळे वारकऱ्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

सोपान महाराज नामदास हे संत नामदेव महाराजांचे 17 वे वंशज आहेत. पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने जाणाऱ्या या दिंडीत त्यांच्यासह अनेक वारकरी सहभागी होते. दरम्यान अचानक उतारावरुन येणारा जेसीबी घुसल्याने एकच गोंधळ उडाला. सकाळी 8 वाजता ही घटना घडली. मृतांमध्ये अतुल महाराज आळशी यांचाही समावेश आहे. ते आळंदी येथील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी होते.

अपघातानंतर ह.भ.प. बंडा तात्या कराडकर हे स्वतः नोबेल हॉस्पिटलमध्ये पोहचून जखमींच्या उपचाराकडे लक्ष देत आहेत. दरवर्षी आळंदी येथे होणारा ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्याला पंढरपूरहून येणाऱ्यांमध्ये संत नामदेव महाराजांची पालखी देखील असते. या पालखीत सुमारे 2 हजार वारकरी सहभागी होत पायी प्रवास करतात. यावर्षी देखील ही पालखी सासवडहून पुणे मुक्कामाला निघाली असताना दिवे घाटात ही घटना घडल्याची माहिती बंडातात्या कराडकर यांनी दिली.

बंडा तात्या कराडकर म्हणाले, “नामदेव महाराज पालखी दिवे घाटातून बरीच पुढे आली होती. त्याचवेळी उतरावरुन येणाऱ्या जेसीबीवरील नियंत्रण सुटल्याने तो थेट दिंडीत घुसला. त्यामुळे 15 ते 20 वारकऱ्यांना गंभीर दुखापत झाल्या. यात दुर्दैवाने संत नामदेव महाराज यांचे 17 वे वंशज सोपानकाका नामदास यांचा जागीच मृत्यू झाला. सोबत अकोला जिल्ह्यातील जोग शिक्षण संस्थेतील मुलाचाही जागीच मृत्यू झाला.”

या अपघाताने वारकरी संप्रदायावर मोठं संकट ओढावलं आहे. असं असलं तरी वारकरी संप्रदाय नियमांप्रमाणे चालणारा पंथ आहे, असंही बंडा तात्या कराडकर यांनी नमूद केलं.

वारकऱ्यांकडून वारंवार पोलीस बंदोबस्ताची मागणी, प्रशासनाचं दुर्लक्ष

वारकऱ्यांनी मागील मोठ्या कालावधीपासून दिंडीदरम्यान पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. मात्र, त्याकडे पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप वारकऱ्यांनी केला आहे. दरवर्षी आम्ही पोलीस विभागाला अर्ज विनंत्या करतो. मात्र, त्यांच्याकडून याची म्हणावी अशी दखल घेतली जात नाही. आषाढीला जो ज्ञानोबांचा सोहळा चालतो त्यात 3 लाखांहून अधिक वारकरी असतात. त्यामुळे पोलीस प्रशासन त्याची दखल घेतं. आत्ताच्या सोहळ्याकडे दुर्लक्ष होतं, असं मत बंडा तात्या कराडकर यांनी व्यक्त केलं.

पालखी सोहळ्याची पार्श्वभूमी

या सोहळ्यासाठी प्रतिवर्षी कार्तिक पोर्णिमेला पालख्या निघतात. आळंदीला वद्य अष्टमीला म्हणजे नवव्या दिवशी पोहचतात. या प्रमाणे यंदाही हा पालखी सोहळा पोर्णिमेला (12 नोव्हेंबर) निघाला. मुक्काम करत 18 नोव्हेंबरला पालखी सासवडला मुक्कामी थांबली. सासवडवरुन पालखी पहाटे 4 वाजता पुढील प्रवासासाठी निघाली. सकाळी 7 वाजल्याच्या सुमारास पालखी दिवे घाटात होती. त्याचदरम्यान ही घटना दिवे घाटात घडली.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.