AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वेदांताचं अपयश मविआचं, आमच्यावर खापर फोडू नका, उद्योगमंत्र्यांची प्रतिक्रिया पाहिली?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  भविष्यात याच तोडीचा किंबहुना यापेक्षा मोठा प्रोजेक्ट महाराष्ट्राला, युवा पिढीला देऊ.. जो रोजगार अपेक्षित आहे, तो आम्ही उपलब्ध करून देऊ, असं आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्याचं सामंत यांनी सांगितलं.

वेदांताचं अपयश मविआचं, आमच्यावर खापर फोडू नका, उद्योगमंत्र्यांची प्रतिक्रिया पाहिली?
उदय सामंत, उद्योगमंत्री Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Sep 14, 2022 | 2:45 PM
Share

मुंबईः  वेदांता प्रकल्प (Vedanta Project) गुजरातला गेल्याचं खापर आमच्यावर फोडू नका. सगळं जे वाईट होतंय, ते आमच्यामुळे आणि चांगलं घडतंय, ते तुमच्यामुळे असं होत नसतं, असं वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केलंय. वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात येत असल्याने शिंदे-भाजप सरकारवर चहुबाजूंनी टीका होतेय. शिंदे (CM Eknath Shinde) हे मोदी-शहांचे हस्तक असल्याने यापुढे असंच होणार, असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांनीही सरकारवर टीका केली. यावर शिंदे सरकारमधील उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रथमच स्पष्टीकरण दिलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं सरकार येऊन फक्त दोन महिने झाले आहेत. मात्र मागील सात महिन्यांतील महाराष्ट्र सरकारच्या धोरणामुळे हे अपयश आलंय, असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलंय.

काय म्हणाले उद्योग मंत्री?

जमीन गुजरातने कशी दिली, तशी द्यायची होती…वाईट झालं तर आमच्यामुळे झालं.. ही राजकारणातली वाईट प्रवृत्ती आहे, तिचा मी जाहीर निषेध करतो. हा प्रोजेक्ट इथे आणण्यासाठी 8 ते 9 महिन्यांपासून प्रयत्न करत होतो. अनेक insentive schemes शासनासमोर ठेवल्या होत्या. दोन महिन्यांपूर्वीच शिंदे-फडणवीसांचं सरकार आलं. वेदांताला आणखी काही देता येईल का, याविषयी चर्चा झाल्या. स्वतः अनिल अग्रवालजींशी फडणवीस यांनी चर्चा केली होती. पण मागचा काही अनुभव पदरी आलेला असताना त्यांनी प्रकल्प गुजरातला हलवण्याचं ठरवलं..

रिफायनरीचं काय करणार आहात? राजापूर रिफायनरीला विरोध करण्याचं खासदारांना सांगायचं.. आमदार समर्थन करत असताना हा दुटप्पीपणा ठेवायचा. म्हणून काल शिंदे साहेबांनी मोदी साहेबांशी चर्चा केल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.

तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  भविष्यात याच तोडीचा किंबहुना यापेक्षा मोठा प्रोजेक्ट महाराष्ट्राला, युवा पिढीला देऊ.. जो रोजगार अपेक्षित आहे, तो आम्ही उपलब्ध करून देऊ, असं आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्याचं सामंत यांनी सांगितलं.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.