व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करता येणार

राज्यातील सांगली जिल्ह्यामधील पोलीस दलात आता ई-सवांद (व्हिडीओ कॉन्फरन्सी) कार्यप्रणाली (Video Conference service in police department) सुरु करण्यात आली आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करता येणार
Follow us
| Updated on: Feb 01, 2020 | 4:43 PM

सांगली : राज्यातील सांगली जिल्ह्यामधील पोलीस दलात आता ई-सवांद (व्हिडीओ कॉन्फरन्सी) कार्यप्रणाली (Video Conference service in police department) सुरु करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात ही कार्यप्रणाली सुरु झाली आहे. यापुढे तक्रार दाखल करण्यासाठी तक्रारदार घटनास्थळावरुन व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पोलीस अधीक्षकांच्या समोर आपली तक्रार मांडू (Video Conference service in police department) शकतो.

तक्रार निवारण दिनी आज (1 फेब्रुवारी) व्हिडीओ कॉन्फरन्स या कार्यप्रणालीची सुरुवात करण्यात आली आहे. सांगलीचे पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी आज सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे जोडून ई-संवाद साधला. यावेळी अनेक तक्रारदारांनी आपल्या समस्या आणि तक्रारी पोलीस अधिक्षक यांच्या समोर मांडल्या.

कारवाई होत नसेल किंवा कारवाईला वेळ लागत असेल तर एखाद्या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदाराला पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागतात. गुन्हा नोंद असलेले पोलीस स्टेशन हे पोलीस अधीक्षक कार्यालयापासून लांब असते. मात्र या कार्यप्रणालीमुळे प्रत्येक आठवड्याला स्वतः पोलीस अधिक्षक प्रत्येक पोलीस स्टेशनशी  व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे संपर्क साधत तक्रारदारांच्या समस्या आणि तक्रारी ऐकून घेऊन पोलिसांना सूचना देऊ शकणार आहेत.

दरम्यान, पोलीस दलातील ई-सवांद कार्यप्रणालीचे जिल्ह्यातील नागरिकांनी कौतुक केले आहे. या कार्यप्रणालीमुळे आता तक्रारदारालाही कमी त्रास होणार आहे.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.