आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून पुन्हा नियमांचं उल्लंघन, आधी औरंगाबादेत, आता जालन्यात कोणते नियम मोडले?

आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून पुन्हा नियमांचं उल्लंघन, आधी औरंगाबादेत, आता जालन्यात कोणते नियम मोडले?
विरेगाव येथे अॅनिमिया मुक्त गाव या राज्यव्यापी मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यातील एका कार्यक्रमात कोरोनासंबंधी नियमांचं उल्लंघन केल्याचं उघडकीस आलं आहे.

दत्ता कानवटे

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Jan 03, 2022 | 2:14 PM


जालनाः महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुन्हा एकदा कोरोनासंबंधी नियमांचं उल्लंघन केल्याची माहिती समोर आली आहे. जालन्यातील विरेगाव येथील एका कार्यक्रमात हा प्रकार घडला. सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेताना 20 लोकांचीच परवानगी देण्यात आली आहे. मात्र खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याच कार्यक्रमात 200 लोकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनीच अशा प्रकारे नियमांचं उल्लंघन केल्यानं जनतेनं कुणाचा आदर्श घ्यावा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विरेगावच्या कार्यक्रमात 200 लोकांची गर्दी

जालन्यातील विरेगाव येथील एका कार्यक्रमात राजेश टोपे यांनी नियमांचं उल्लंघन केल्याचं समोर आलं आहे. विरेगाव येथे अॅनिमियामुक्त गोव मोहिमेच्या कार्यक्रमासाठी त्यांनी शेकडो लोकांची गर्दी जमवल्याचे दिसून आले. या कार्यक्रमासाठी खरं तर 20 जणांची परवानगी देण्यात आली होती. मात्र कार्यक्रमात 200 पेक्षा जास्त लोकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. राजेश टोपे यांनी यापूर्वी औरंगाबादमधील कार्यक्रमातदेखील कोरोनाविषयक नियमांचं उल्लंघन केलं होतं. आता जालन्यातही तोच प्रकार पहायला मिळत आहे. खुद्द आरोग्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच नियमांना फाटा लावलो जातोय. आता यातून कोरोनाचा प्रसार झाल्यास, त्याला जबाबदार कोण राहील, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जालन्यातून आज किशोरवयीनांच्या लसीकरणाला प्रारंभ

विरेगाव येथील कार्यक्रमापूर्वी जालन्यातील महिला व बाल रुग्णालयात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. टोपे यांच्या उपस्थितीत दहा ते बारा किशोरवयीन मुलांना लस देण्यात आली. या वयोगटातील मुलेच जास्त फिरणारी असतात, त्यामुळे त्यांना लस देणे अत्यंत आवश्यक होते, असे टोपे यांनी सांगितले. तसेच त्यापेक्षाही लहान म्हणजे 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांचेही लसीकरण सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

इतर बातम्या-

गुंतवणूकदारांसाठी पुन्हा एकदा सुगीचे दिवस, IPO मधून होऊ शकते कमाई! येत्या तीन महिन्यात गुंतवणुकीच्या नव्या संधी 

Weather Update | कडाक्याच्या थंडीत ढगाळ वातावरण, राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज

Car Accident| टायर फुटून कार टँकरवर आदळली; दीड वर्षाच्या नातीसह आजीने सोडले प्राण

 

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें