विराट-अनुष्का, तुम्ही उत्तम पालक व्हाल, पंतप्रधान मोदींकडून कौतुक

कोहलीने मोदींना शुभेच्छा देताना "देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा" असे म्हटलं होते.(PM Modis tweet on Virat and Anushka)

  • Updated On - 4:17 pm, Fri, 18 September 20 Edited By: सचिन पाटील Follow us -
विराट-अनुष्का, तुम्ही उत्तम पालक व्हाल, पंतप्रधान मोदींकडून कौतुक

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वाढदिवसानिमित्त विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. पंतप्रधान मोदींनी काल 17 सप्टेंबरला 70 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी सोशल मीडियावरुन अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनीही शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार मानले. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनेही मोदींना शुभेच्छा दिल्यानंतर, पंतप्रधानांकडून कोहली आणि अनुष्काला हटके धन्यवाद दिले. (Virat Kohli and Anushka Sharma receive a sweet congratulatory message from PM Narendra Modi )

विराट कोहलीने मोदींना शुभेच्छा देताना “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा” असे ट्विट केले होते. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी “धन्यवाद, विराट कोहली. मी तुझे आणि अनुष्काचे अभिनंदन करतो, मला विश्वास आहे की तुम्ही उत्तम पालक व्हाल ” असे म्हटलं.

नुकतंच विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने येत्या जानेवरी महिन्यात आपल्या घरी नवीन पाहुणा येणार असल्याची गोड बातमी, चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती.

View this post on Instagram

And then, we were three! Arriving Jan 2021 ❤️🙏

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

त्यानंतर दोघांवरही चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता. तसेच सोशल मीडियावर अनुष्काचे फोटोसुद्धा वायरल झाले होते.

अनुष्काचे फोटोशूट

दरम्यान, अनुष्का शर्माने काही दिवसापूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत आपला अनुभव शेअर केला आहे. या फोटोला “आपल्यामध्ये जीवनाची निर्मिती अनुभवण्यापेक्षा काहीही वास्तविक आणि नम्र नाही” असे कॅप्शन दिले होते. या फोटोवर विराटने “माझे संपूर्ण विश्व एका फ्रेममध्ये” अशी कमेंट केली होती.

हार्दिक पांड्याच्या घरीही नवा पाहुणा

एकीकडे विराट-अनुष्काची चर्चा सुरु असताना, तिकडे भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याही नुकताच बाबा बनला आहे. हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविचने गेल्या महिन्यात मुलाला जन्म दिला. हार्दिकने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोड बातमी दिली होती. हार्दिक पांड्याने बाबा झाल्याचं सोशल मीडियावर सांगताच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. हार्दिकचे चाहते आणि टीम इंडियाच्या खेळाडूंनी त्याच्या आयुष्यातील या नव्या पाहुण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

संबंधित बातम्या

Virat Kohli | विराटच्या घरी नवा पाहुणा येणार, अनुष्काने दिली ‘गुड न्यूज’

Hardik Pandya | हार्दिक पांड्याच्या घरी पाळणा हलला, चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

Published On - 4:11 pm, Fri, 18 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI