लोकप्रिय कार्टूनचा ‘बाप’ माणूस! ज्याने मिळवले सर्वात जास्त ऑस्कर पुरस्कार…
‘द लकी रॅबिट’ ( Oswald the Lucky Rabbit) असे नाव त्याने त्या कार्टूनला दिले. हे कार्टून खूप गाजले. पण, एका मित्राने त्यांची फसवणूक करून त्याचे अधिकार आपल्याकडे घेतले. त्यामुळे कार्टूनमधून मिळणारे सर्व उत्पन्न मित्राला मिळत होते. परिणामी कामगारांचे पगार थकले, स्टुडीओ बंद करण्याची वेळ आली.

मुंबई : जगातील फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात महत्वाचा मानला जाणारा पुरस्कार म्हणजे ऑस्कर पुरस्कार. भले भले सेलेब्रेटी हा पुरस्कार मिळावा म्हणून जीवाचे रान करतात. जीव ओतून काम करतात तरीही त्यांच्या नशिबी हा पुरस्कार नसतो. ऑस्कर पुरस्कारांचे फक्त नामांकन मिळणे ही सुद्धा एक मोठी प्रतिष्ठेची बाब मानली जाते. तितके जरी मिळाले तरी लोक खूष होतात. नामांकन मिळाले आणि पुरस्कार मिळाला नाही तरीही हे कलाकार खुश असतात. परंतु, याच फिल्म इंडस्ट्रीत एका असाही महान कलाकार होता. ज्याने एक दोन नव्हे तर तब्बल 22 ऑस्कर पुरस्कारावर आपले नाव कोरले. शिवाय त्या कलाकाराचे 59 पुरस्कारांसाठी नामांकन झाले होते. 1932 साली त्या महान कलाकाराला सर्वोत्कृष्ट लघू विषयातील (कार्टून) पुरस्कारासोबत तब्बल चार ऑस्कर पुरस्कार मिळाले होते. हा कलाकार म्हणजेच ‘मिकी माऊस’ या जगभरात लोकप्रिय झालेल्या कार्टूनचा निर्माता, लेखक वॉल्ट डिस्ने… कधी काळी व्हॅक्युम क्लीनर विकणारा ते जगातील सर्वात जास्त ऑस्कर मिळविणारा कलाकार हा त्याचा प्रवास काही सहजासहजी घडलेला नाही. याच ऑस्कर विजेत्या वॉल्ट डिस्ने याची ही चित्त...
