AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ध्याच्या ऑरगॅनिक मास्कला इंग्लंडमध्ये मागणी, साहेबांच्या तोंडावर सेंद्रिय कापसाचे मास्क

वर्ध्याच्या ऑरगॅनिक कापसापासून तयार केलेले खादीचे मास्क इंग्लंडच्या बाजारात मागवले जात आहेत. (Wardha organic mask demand in England)

वर्ध्याच्या ऑरगॅनिक मास्कला इंग्लंडमध्ये मागणी, साहेबांच्या तोंडावर सेंद्रिय कापसाचे मास्क
Wardha organic mask demand in England
| Updated on: Aug 06, 2020 | 2:36 PM
Share

वर्धा : स्वातंत्र्य लढ्यासाठी महत्वाचे शस्त्र ठरलेल्या महात्मा गांधी यांच्या खादीचे आज महत्व वाढले आहे. खादी कापड वस्त्र म्हणून तर साता समुद्रापलीकडे पोहचले होते. पण आता हीच खादी मास्कच्या रुपात इंगलडमध्ये पोहचली. कोरोनाच्या लढ्यात महत्वाची भूमिका पार पाडणारी खादी इंग्लंडमध्ये पसंतीला उतरली आहे. वर्ध्याच्या ऑरगॅनिक कापसापासून तयार केलेले खादीचे मास्क इंग्लंडच्या बाजारात मागवले जात आहेत. एवढेच नाही तर शिस्तीत मास्क बांधणाऱ्या ब्रिटिशांना आता हा मास्क संरक्षक ठरत आहे. (Wardha organic mask demand in England)

मार्च महिन्यात भारतात झालेला कोरोनाचा शिरकाव आणि लगेच वाढलेली धावपळ सर्वांनाच भयभीत करणारी होती. लॉकडाऊन लागताच मास्कचे महत्त्वही वाढले. पण निर्यातीवर बंदी असल्याने मास्क बाहेर देशात जात नव्हते. बंदी उठली आणि वर्धा जिल्ह्यात तयार होणारे खादी मास्क भारतासह इंग्लडमध्येदेखील पोहचले.

आता गोपुरीच्या ग्राम सेवा मंडळाने एक पाऊल आणखी पुढे जात, अस्सल सेंद्रिय कपाशीच्या कापडापासून मास्क बनवायला सुरुवात केली. इंग्लंडमधील खादीमध्ये कार्यरत मित्रांना हे मास्क पाठविण्यात आले. तेथे त्यांनी ते विक्रीला ठेवले. इंग्लंडमध्ये हे सेंद्रिय मास्क ग्राहकांच्या चांगलेच पसंतीला पडले.

ऑरगॅनिक कापसापासून निर्मित खादीचे तयार केलेले मास्क इंग्लंडच्या बाजारात जाऊ लागले आहेत. सातासमुद्रापार पोहोचलेल्या या सेंद्रिय मास्कने विदेशातही खादीचे गुणगाण गायले आहेत. 1934 मध्ये आचार्य विनोबा भावे यांनी ग्रामसेवा मंडळाची स्थापना केली होती. इथं कापसापासून कापड निर्मितीची प्रक्रिया केली जाते. त्याकरिता तेथूनच त्याचं डिझाईन, लांबी, रुंदी, शिलाईची पद्धतही सांगितली.

जवळपास एक महिना त्यावर बारीक काम केल्यावर मास्क पाठवण्यात आले आहेत. हे मास्क पसंतीला उतरत असून ग्रामसेवा मंडळाला एक हजार मास्कची ऑर्डर मिळाली आहे. हे मास्क श्वसनाला चांगले असून घाम आला तरी त्रास होत नाही. निर्जंतुकीकरण करता येते. गरम पाण्यातही धुवून वापरता येतात. लवकरच नवीन ऑर्डर मिळतील, असा विश्वास ग्रामसेवा मंडळाच्या अध्यक्ष करुणा फुटाणे यांनी व्यक्त केला आहे.

हा मास्क दिलेल्या मापातच तंतोतंत शिवावा लागतो. थ्री लेअर मास्क धुवून वापरता येतो. एक मास्क शिवायला जवळपास 20 ते 30 मिनिटे लागतात. रोजगार गमावलेल्या काळात खादीने रोजगार मिळवून देण्यासाठी हातभार लावला आहे. ग्रामीण भागात आता खादी मोठे रोजगाराचे साधन बनले आहे.

कोरोनापासून संरक्षण आणि हाताला काम अशी दुहेरी भूमिका पार पाडणाऱ्या खादीने मास्कच्या रुपात कोरोनाच्या लढ्यात आपले योगदान दिले आहे.

(Wardha organic mask demand in England)

संबंधित बातम्या 

Buldhana Gold Mask | बुलडाण्यात तब्बल साडे सहा तोळ्याचा सोन्याचा मास्क 

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.