भारतासाठी पुलगाव का महत्त्वाचं?

भारतासाठी पुलगाव का महत्त्वाचं?

वर्धा:  देशातील सर्वात मोठं शस्त्र भांडार असलेलं वर्ध्यातील पुलगाव पुन्हा स्फोटाने हादरलं. 2016 मधील भीषण स्फोटाच्या आठवणी ताज्या असतानाच, आज पुन्हा एकदा पुलगावमध्ये स्फोटांची मालिका पाहायला मिळाली. बॉम्ब निकामी करण्याच्या केंद्रावर हा स्फोट झाला. बॉम्ब डिमॉलिश करताना पेटी हातातून पडल्यानंतर स्फोट झाला. त्यामुळे या स्फोटात सहा जणांचा जागीच मृत्यू, तर 10 मजूर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. जखमी मजुरांवर सावंगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. बॉम्ब डिमॉलिश करताना पेटी हातातून पडल्याची माहिती मिळते आहे. त्यानंतर या ठिकाणी स्फोट झाला. स्फोटानंतर तिथे आगही लागली. त्यामुळे मोठी अफरातफर माजली आणि त्यात पाच जणांचा मृत्यू झाला.

पुलगाव शस्त्रभांडार नेमकं काय आहे?

– वर्ध्यातील पुलगाव हे देशातील सर्वात मोठं तर आशियातील दुसऱ्या क्रमाकांचं शस्त्र भांडार आहे

– पुलगावात दारुगोळा बनवला जातोच, शिवाय मोठा शस्त्रसाठाही ठेवला जातो.

-बॉम्ब, दारुगोळा अशी मोठी युद्ध सामुग्री इथं साठवली जाते

-देशाच्या विविध ठिकाणी तयार झालेली स्फोटकं पुलगाव लष्करी तळावर साठवली जातात

– पुलगावात जवळपास 200 अधिकारी आणि सुमारे 5 हजार स्थानिक कामगार काम करतात

-दोन वर्षापूर्वी मे 2016 मध्येही इथे स्फोट होऊन 2 अधिकाऱ्यांसह 20 जणांचा मृत्यू झाला होताते.  त्यावेळी बंकर फुटल्याने आजूबाजूचे गार्डस मृत्यूमुखी पडले होते.

-पुलगावचा शस्त्रसाठा परिसर किंवा दारुगोळा भांडार हा 28 किमीचा परिसर आहे. त्यामुळे या परिसराला मोठं सुरक्षा कवच असतं.

-या परिसरात जवानांशिवाय अन्य कोणालाही प्रवेश दिला जात नाही.

-इथे शस्त्रसाठ्यासाठी अनेक बंकर केले जातात, यातील प्रत्येक बंकरमध्ये जवळपास 5 हजार किलोपर्यंतचा शस्त्रसाठा असतो.

शस्त्रभांडारात नेमकं काय काय?

देशातील सर्वोच्च शस्त्रघर असलेल्या पुलगाव शस्त्रभांडारात सर्वोच्च लष्करी सामुग्री आहे. यामध्ये तोफा, तोफगोळे, बंदुका, गोळ्या, बॉम्ब, रणगाड्यातील तोफगोळे, रॉकेट लाँचर, रॉकेट

संबंधित बातम्या 

वर्ध्यात मिलिट्रीच्या तळावर भीषण स्फोट, सहा जण ठार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI