वाशिम ZP निकाल : महाविकासआघाडीची सत्ता, राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष

जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्हा परिषदेच्या 52 जागांचे निकाल जाहीर झाले (Washim ZP election result) आहेत.

वाशिम ZP निकाल : महाविकासआघाडीची सत्ता, राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष

वाशिम : जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्हा परिषदेच्या 52 जागांचे निकाल जाहीर झाले (Washim ZP election result) आहेत. यात सर्वाधिक 12 जागा जिंकून राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. वाशिम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नसल्याने जिल्ह्यात महाविकास आघाडीची सत्तास्थापन होईल असा अंदाज वर्तविला जात (Washim ZP election result) आहे.

वाशिम जिल्हा परिषदेच्या मतमोजणीला आज (8 जानेवारी) सकाळी 10 वाजतापासून शासकीय तंत्रनिकेतन येथे सुरुवात झाली. यामध्ये सर्वाधिक 12 जागा जिंकत राष्ट्रवादी क्रमांक एकच पक्ष ठरला आहे. तर काँग्रेसने 09 जागांवर आणि वंचित आघाडीने 09  जागांवर विजय मिळवला. त्याशिवाय भाजपा 7, शिवसेना 06 जागी विजयी झाली आहे.

माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या जिल्ह्यात जनविकास आघाडीने 6 जागी आपले उमेदवार निवडून आणले आहेत. तर स्वाभिमानी शेतकरी संघटना 1 तर दोन ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभव पत्करावा (Washim ZP election result) लागला.

वाशिमचे विद्यमान आमदार लखन मलिक यांचा मुलगा नितेश मलिक यांचा वारा सर्कल मधून पराभव झाला. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव यांचा राजुरा सर्कलमधून पराभव झाला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांच्या पत्नी आशा मापारी यांचा वारा सर्कलमधून पराभव (Washim ZP election result) झाला.

वाशिम जिल्हा परिषद निकाल

जिल्हा परिषद एकूण जागा -52

जाहीर झालेला निकाल-52

  • राष्ट्रवादी 12
  • भाजपा -07
  • काँग्रेस -09
  • शिवसेना -06
  • वंचित बहुजन आघाडी – 08
  • जनविकास आघाडी 06
  • अपक्ष 03
  • स्वाभिमानी-01

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI