AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona pandemic | येत्या दोन वर्षात कोरोनाचा नायनाट होईल, WHO प्रमुखांना विश्वास

कोरोनाचा (Coronavirus) नायनाट येत्या दोन वर्षात होऊ शकतो, असं जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)म्हटलं आहे. (Coronavirus pandemic will be over in two years) 

Corona pandemic | येत्या दोन वर्षात कोरोनाचा नायनाट होईल, WHO प्रमुखांना विश्वास
फोटो : 'जागतिक आरोग्य संघटने'चे डायरेक्टर जनरल टेड्रोस अॅडॅनॉम घेब्रेयसिस
| Updated on: Aug 22, 2020 | 11:11 AM
Share

नवी दिल्ली : जगभरात COVID-19 कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2.25 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. कोरोना विषाणूवरील लस शोधण्याचं काम जगभरात सुरु आहे. अशावेळी कोरोनाचा (Coronavirus) नायनाट येत्या दोन वर्षात होऊ शकतो, असं जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)म्हटलं आहे.  (Coronavirus pandemic will be over in two years)

WHO चे प्रमुख टेड्रोस अधानोम (Tedros Adhanom Ghebreyesus) यांच्या मते, “आम्हाला आशा आहे की कोरोनाचं हे संकट कमीत कमी दोन वर्षात संपू शकेल. 1918 मध्ये जगभरात धुमाकूळ घालणारा स्पॅनिश फ्लूचा नायनाट होण्यासाठीही जवळपास दोन वर्षांचा कालावधी लागला होता”

टेड्रोस अधानोम म्हणाले, “सध्याच्या कोरोनाकाळात आम्ही आता अधिक सक्षम झालो आहोत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठीचं आवश्यक तंत्रज्ञान आणि माहिती उपलब्ध होत आहे”.

अमेरिकेत सर्वाधिक संसर्ग चीनमधून पसरलेल्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातलं. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर सिस्टिम सायन्स अँड इंजिनियरिंगच्या (CSSE) आकडेवारीनुसार शुक्रवारी सकाळपर्यंत जगातील कोरोना रुग्णांचा आकडा हा 2 कोटी 25 लाख 93 हजार 363 वर पोहोचला. आतापर्यंत 7 लाख 92 हजार 396 जणांचा मृत्यू झाला आहे.

महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेत 55 लाख 73 हजार 501 रुग्ण आढळले. यापैकी 1 लाख 73 हजार 114 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले. अमेरिकेपाठोपाठ ब्राझीलमध्ये 35 लाख 01 हजार 975 रुग्ण असून, तिथे 1 लाख 12 हजार 304 रुग्णांचा मृत्यू झाला.

कोरोना रुग्णसंख्येत भारत तिसऱ्या स्थानावर आहे. भारतातील रुग्णसंख्या 28 लाख 36 हजार 925 इतकी आहे.

10 हजारांपेक्षा अधिक मृत्यू झालेले देश कोरोनामुळे दहा हजारांपेक्षा जास्त मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत मेक्सिको (59,106), भारत (53,866), , ब्रिटन (41,489), इटली (35,418), फ्रान्स (30,434), स्पेन (28,797), पेरु (26,834), इराण (20,264), रशिया (16,058), कोलंबिया (15,979), दक्षिण अफ्रीका (12,618) आणि चिली (10,671) यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या 

लोकांना मदत करताना कोरोना, पीपीई किट घालून एकनाथ शिंदे फ्रंटलाईन शिवसैनिकांच्या भेटीला 

(Coronavirus pandemic will be over in two years)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.