सरकारमध्ये दम असेल तर वीज बिलाची वसुली करुन दाखवावीच; राजू शेट्टींचे आव्हान

लॉकडाऊनच्या काळात राज्यातील अनेक भागांतील नागरिक आणि व्यावसायिक आस्थापनांना वीजेची भरमसाट बिले आली होती. | Raju Shetti

सरकारमध्ये दम असेल तर वीज बिलाची वसुली करुन दाखवावीच; राजू शेट्टींचे आव्हान
Follow us
| Updated on: Nov 18, 2020 | 2:13 PM

मुंबई: लॉकडाऊनच्या काळातील वीज बिलाचे पैसे (electricity bill ) आम्ही भरणार नाही. आता सरकारमध्ये दम असेल तर त्यांनी आमच्याकडून वीज बिलाची वसूली करुनच दाखवावी, असे जाहीर आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju shetti) यांनी दिले. राज्य सरकारने वीज बिल माफ करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. वीज बिलं माफ केली नाहीत तर शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करु, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला. (We will not pay electricity bill in lockdown period says former MP Raju Shetti)

लॉकडाऊनच्या काळात राज्यातील अनेक भागांतील नागरिक आणि व्यावसायिक आस्थापनांना वीजेची भरमसाट बिले आली होती. यावरून गदारोळ झाल्यानंतर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजेची बिलं कमी केली जातील, असे आश्वासन दिले होते. मात्र, मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना नितीन राऊत यांनी आपल्या वक्तव्यावरुन घूमजाव केले होते. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला.

लॉकडाऊनच्या काळातील घरगुती विजेचे तीन महिन्यांचे बील सरकारने माफ केलेच पाहिजे. सरकारकडे त्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. लॉकडाऊनच्या काळातील वीजेचे बिल सामान्य माणूस कोणत्याही परिस्थितीत भरणार नाही, हे मी ठामपणे सांगतो. सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी लोकांकडून बिल वसूल करून दाखवावेच, असे राजू शेट्टी यांनी म्हटले.

लोकांनी वीज‌ वापरली त्याचे बिल भरावे, कुठलीही वीजबिल माफी (Electricity Bill) मिळणार नाही, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे आता या मुद्द्यावरुन महाराष्ट्रात राजकारण रंगले आहे.

लॉकडाऊनमध्ये आलेली बिलं भरली पाहिजेत. आम्ही पण ग्राहक आहोत. कर्ज घेऊन मदत करत आहोत, कामकाज चालवण्यासाठी आम्हालाही मर्यादा आहेत. वीज बिल सवलतीचा विषय आता नाही, असे नितीन राऊत यांनी स्पष्ट केले होते. संबंधित बातम्या:

Pravin Darekar | वीज बिल माफीच्या आश्वासनाचे काय झालं? प्रवीण दरेकरांचा ऊर्जामंत्र्यांना सवाल

श्रेयवादाच्या लढाईत वीज बिलमाफी अडकली?, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ऊर्जामंत्र्यांची फाईल फेटाळत असल्याचा बावनकुळेंचा आरोप

‘विरोधात होता तेव्हा वीज बिलं माफ करा म्हणत होतात मग आता काय झालं?’, सदाभाऊ खोत यांचा उर्जामंत्र्यांना सवाल

(We will not pay electricity bill in lockdown period says former MP Raju Shetti)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.