AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Alert: पुढच्या 3-4 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान खात्याकडून इशारा

हवामान विभागाचे उपसंचालक के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढचे 3-4 तास धोक्याचे असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Weather Alert: पुढच्या 3-4 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान खात्याकडून इशारा
| Edited By: | Updated on: Oct 11, 2020 | 1:03 PM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांत परतीच्या पावसाने राज्यात जोरदार हजेरी लावली. शनिवारीही अनेक ठिकाणी विजांसह मुसळधार पाऊस झाल्याने 16 राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. आजही राज्याच्या अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तर पुढच्या काही तासांत जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे अतिमहत्त्वाचं काम नसल्यास घरी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (weather news Possibility of heavy rains with mod TS in Maharashtra next 3 4 hrs)

हवामान विभागाचे उपसंचालक के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढचे 3-4 तास धोक्याचे असल्याचं सांगण्यात आलं आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलढाणा आणि शेजारच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल आधीच कोरड्या जागी ठेवावा तर नागरिकांनीही विनाकारण बाहेर पडू नये.

दरम्यान, जालन्यात बऱ्याच तासापासून जोरदार पावसास सुरू आहे. शहरासह तालुक्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. परतूर शहरात गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांचे हाल होत असल्याची माहिती समोर येत आहे. तर मुसळधार पावसामुळे सोयाबीन, तुर, कापसाचे मोठ्या प्रमाणआत नुकसान झालं आहे.

11 ऑक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोवा , विदर्भाच्या काही भागात जोरदार पावसांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 16 जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मच्छिमारी करम्यासाठी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आलं आहे. येत्या दोन दिवसातील पावसाच्या काळात शेतक-यांनीही योग्य ती काळजी घ्यावी, असं हवामान विभाकडून सांगण्यात आलं आहे. (weather news Possibility of heavy rains with mod TS in Maharashtra next 3 4 hrs)

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्यामुळे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेशासह मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. 9 ते 12 ऑक्टोबर दरम्यान आंध्र प्रदेश, रायलसीमा, तामिळनाडुसह विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य मॉन्सूनची चाहूल लागली असून आसाम, मेघालय परिसरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवली आहे.

इतर बातम्या – 

Paytm बँकेची जबरदस्त योजना, 13 महिन्यांच्या FDवर डायरेक्ट मिळणार 7 टक्के व्याज

मनसे आणि शिवसेनेत मध्यरात्री गुप्त बैठक, राजकीय चर्चांना उधाण

(weather news Possibility of heavy rains with mod TS in Maharashtra next 3 4 hrs)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.