पोलीस मामाच्या भूमिकेत, लॉकडाऊनमुळे जिल्ह्याच्या सीमेवरच शुभमंगल

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात (Wedding on Wardha border during lockdown) आला आहे.

पोलीस मामाच्या भूमिकेत, लॉकडाऊनमुळे जिल्ह्याच्या सीमेवरच शुभमंगल
Follow us
| Updated on: May 06, 2020 | 4:19 PM

वर्धा :राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात (Wedding on Wardha border during lockdown) आला आहे. त्यामुळे अनेकांची लग्न पुढे ढकलण्यात आली आहे. याच दरम्यान वर्धा-यवतमाळच्या सीमेवर एक अनोखा लग्न समारंभ पार पडला आहे. लॉकडाऊनमुळे जिल्हाबंदी असल्याने वधू-वराचे लग्न थेट वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या लग्न समारंभात पोलिसांनीही सहभाग घेतला. तसेच एका पोलिसाने वधूच्या मामाची भूमिका (Wedding on Wardha border during lockdown) निभावली.

यवतमाळ जिल्ह्यातील घारफळच्या रावबाजी आहाके यांचा मुलगा विठ्ठला याचे वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील लादगड येथील अशोकराव मरसकोल्हे यांची मुलगी प्रविणाशी लग्न जुळले होते. या दोघांचे 6 मे रोजी लग्न ठरले होते. त्यानुसार विवाह मुहूर्त उरकविण्याची तयारी करण्यात आली. लग्नसाठी परवानगी काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण परवानगी मिळालीच नाही. त्यामुळे नवरदेव मोठ्या हिंमतीने थेट वर्धा येथे जाण्यास निघाला. पण वर्ध्या जिल्ह्याच्या सीमेवरच पोलिसांनी नवरदेवाला रोखले.

पोलिसांनी रोखल्यामुळे लग्नाचा मुहूर्त जाणार, हळदीच्या विधीवरही पाणी फिरणार होते. पण पोलिसांनीच थेट वधूला सीमेवर बोलावून घेण्याचा सल्ला वराला दिला. त्यानंतर वर्धा जिल्ह्याच्या नदी काठाजवळील कडुलिंबाच्या झाडाखाली वधू-वराचा विवाह सोहळा पार पडला. यावेळी खाकीतल्या एका पोलिसाने वधूच्या मामाचीही भूमिका बजावली.

यावेळी वराच्या सोबतीला असलेल्या भटजींनी आदिवासी पद्धतीने विवाह पार पाडण्याच्या दृष्टीने तयारी सुरु केली. पोलिसांनी आपल्या बसण्याकरिता असलेल्या खुर्च्या वधू-वराला उपलब्ध करून दिल्या. वर आणि वधूला मंगलाष्टकांच्या साक्षीने अक्षदा टाकून शुभमंगल सावधान करण्यात आले. लिंबाच्या झाडाखालीच पोलीस वऱ्हाडी बनले. नावदाम्पत्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी खाकीतल्या पोलिसाने मुलीच्या मामाची भूमिका बजावली.

अत्यंत साधेपणाने आणि अतिशय कमी वेळेत आदिवासी पद्धतीने हा विवाह पार पडला. लग्न उरकवून नवरदेव आपल्या वधूला घेऊन परतीच्या वाटेवर निघाले.

लॉकडाऊन दरम्यान जिल्ह्याच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. तसेच वर्धा, यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरही पोलिसांचा बंदोबस्त आहे. पोलिसांच्या कडक पाहऱ्यात कुणी या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जाऊच शकत नाही अशीच इथली परिस्थिती. त्यामुळे हा लग्न सोहळा जिल्ह्याच्या सीमेवर पार पडला.

मे महिना तसा लग्नसराईच्या महिना आहे. पण लॉकडाऊनमुळे या महिन्यातील लग्न पुढे ढकलण्यात येत आहेत. काहीजण अगदीच पाच लोकांमध्ये लग्न समारंभ उरकून घेत आहेत. पण यातील कुठलाच पर्याय कामी न पडल्यामुळे अखेर सीमेवरच लग्न आणि कन्यादान झाले. ओझरत्या नजरेने वधुने आपल्या आई – वडिलांकडून आशीर्वाद घेतले.

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनमुळे 10 बाय 10 च्या घरात लग्न, पोलीस वऱ्हाडी, 5-6 जणांची हजेरी

Lockdown : शेतातील मंदिराच्या ओट्यावर लेकीचं लग्न लावलं, निफाडच्या शेतकऱ्याचं राज्यभर कौतुक

पुण्यात अनोखं लग्न, मुलाचे वडील देहरादूनमध्ये, मुलीचे वडील नागपुरात, पोलिसांकडून कन्यादान

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.