दिवाळीत गोड पदार्थ खाऊनही वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी टिप्स

दिवाळीत गोड पदार्थ खाऊनही वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी टिप्स

गोड फराळावर ताव मारण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवलात, तर तुमची दिवाळी नक्की आरोग्यदायी (Weight loss tips in Diwali) होईल.

Namrata Patil

|

Oct 26, 2019 | 4:55 PM

मुंबई : दिवाळी म्हटलं की फराळ, मिठाई, गोड पदार्थ याची अगदी पंगत असते. दिवाळीत शंकरपाळी, करंजी, लाडू, नानकटाई, अनारसे यासारख्या अनेक पदार्थांचा फराळात समावेश असतो. पूर्वी दिवाळी म्हटलं की, अनेकजण हवे तितकं हवे तेवढे गोड पदार्थ (Weight loss tips in Diwali) खायचे. मात्र आता वजन वाढणे, मधुमेह, कॅलरी काऊंटींग यासारख्या अनेक कारणांनी लोकांनी मिठाई खाणे बंद केले आहे. मात्र गोड फराळावर ताव मारण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवलात, तर तुमची दिवाळी नक्की आरोग्यदायी (Weight loss tips in Diwali) होईल.

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी टिप्स (Weight loss tips in Diwali)

1. अनेकांना सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी कोणत्याही गोड पदार्थ खाण्याची सवय असते. पण यामुळे तुम्हाला जंताचा त्रास होण्याचा प्रयत्न होऊ शकतो. विशेषत: लहान मुलांना सकाळी गोड पदार्थ खाण्यापासून टाळावे.

2. ‘खाने के बाद, कुछ मीठा हो जाये’ असे अनेकदा म्हटलं जातं. आपण सर्वजण सहसा जेवणानंतर गोड पदार्थ खातो. मात्र यामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त कॅलरी वाढतात. यामुळे तुमचे वजन वाढते.

3. अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी गोड खाण्याची सवय असते. काही जण तर अगदी मध्यरात्री उठूनही गोड पदार्थ खातात. मात्र यामुळे तुमच्या शरीरात कॅलरी वाढतात. तसेच रक्तातील साखरेच्या प्रमाणातही वाढ होते. यामुळे तुम्हाला मधुमेह धोका संभावतो.

4. दिवाळीत किंवा कोणत्याही सणाच्या दिवशी घरात जास्त काळ मिठाई फ्रिजमध्ये ठेऊ नका. यामुळे तुम्हाला इन्फेक्शन होण्याचा धोका संभावतो.

5. दिवाळीत काजू कतली, लाडू, गुलाबजाम, बर्फी अशा अनेक गोड पदार्थांवर आपण सर्रास ताव मारतो. मात्र त्याऐवजी कप केक किंवा चॉकलेट असे पाश्चिमात्य देशातील गोड पदार्थ खा. यामुळे तुमच्या शरीरात रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

6. बाजारात विक्री होणाऱ्या गोड पदार्थांपेक्षा घरगुती मिठाई खावी. यामुळे शरीराला कोणतीही हानी होत नाही. घरगुती बनवलेल्या गोड पदार्थांमध्ये ग्लाईसेमिक इंडेक्स कमी होतो. ज्यामुळे रक्तात साखर वाढण्यापेक्षा ती नियंत्रणात राहते.

7. मधुमेह असणाऱ्या रुग्णांना गोड खाण्याची मनाई असते. पण दिवाळी म्हटल्यावर तुम्ही थोडं गोड पदार्थ खाऊ शकता. मात्र दुकानातील रेडीमेड मिठाई खाण्यापेक्षा घरगुती गोड पदार्थांना प्राधान्य देणे गरजेचे आहे.

8. जेवणादरम्यान मिठाई खाणे अधिक फायदेशीर आहे. त्यामुळे रक्तातील साखरचे प्रमाण योग्य राहते. तसेच तात्काळ एनर्जीही मिळते.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें