फेक टीआरपी म्हणजे काय? असा चालतो आकड्यांचा खेळ

जाहिरातदार एखाद्या चॅनेलला जाहिरात देताना टीआरपी रेटिंग बघतात.

फेक टीआरपी म्हणजे काय? असा चालतो आकड्यांचा खेळ
Follow us
| Updated on: Oct 08, 2020 | 5:56 PM

मुंबई: टेलिव्हिजन चॅनेल्सच्या टीआरपीमध्ये फेरफार करणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. यानंतर आता टीआरपी म्हणजे नक्की काय असते, त्याचे मोजमाप नक्की कसे केले जाते, याविषयी सामान्य लोकांमध्ये चर्चा सुरु आहे. टीआरपीच्या एका पॉईंटवर जाहिराविश्वात मोठे बदल घडू शकतात. याच टीआरपी रेटिंगवर टेलिव्हिजन चॅनेल्सला जाहिराती मिळतात. त्यामुळे टीआरपीचे आकडे हे चॅनेल्ससाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. (What is TRP and how does it count)

टीआरपी म्हणजे काय? टीआरपीचा अर्थ टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट (Television Rating Point ) असा होतो. यावरुन प्रेक्षक कोणते टेलिव्हिजन चॅनेल जास्त पाहतात, हे ठरवले जाते. टेलिव्हिजन विश्वात कोणती मालिका किंवा वृत्तवाहिन्यांवरील कोणता शो सर्वात जास्त लोकप्रिय आहे, याचे मोजमापही टीआरपीच्या आधारेच केले जाते. सध्याच्या स्पर्धेच्या युगात जाहिराती मिळवण्यासाठी टीआरपी रेटिंग अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

टीआरपी कसा मोजतात? टीआरपी मोजण्यासाठी देशातील प्रत्येक शहरात पीपल्स मीटर किंवा बॅरोमीटर लावलेले असतात. याआधारे प्रेक्षकांचे एक ढोबळ सर्वेक्षण केले जाते. यामध्ये काही हजार प्रेक्षकांना समाविष्ट करून घेतले जाते. विशिष्ट ठिकाणी लावलेल्या पीपल्स मीटरवर नोंदवण्यात आलेल्या माहितीवरून लोक टेलिव्हिजनवर सर्वाधिक वेळ कोणते चॅनेल किंवा कार्यक्रम पाहत आहेत, याचा अंदाज घेतला जातो.

या पीपल्स मीटरवर प्रत्येक मिनिटाला नोंदवण्यात आलेली माहिती इंडियन टेलिव्हिजन ऑडियन्स मेझरमेंट ( Indian Television Audience Measurements) संस्थेकडे पोहोचवली जाते. यानंतर IATM कडून टीआरपीचा अहवाल प्रसिद्ध केला जातो.

चॅनेलच्या महसूलावर टीआरपीचा परिणाम कसा होतो? टीआरपीचा थेट परिणाम चॅनेलच्या उत्पन्नावर होतो. जाहिरातदार एखाद्या चॅनेलला जाहिरात देताना टीआरपी रेटिंग बघतात. याचआधारे कोणत्या कार्यक्रमावेळी आपली जाहिरात दाखवली जावी, याचा निर्णय जाहिरातदारांकडून घेतला जातो. त्यामुळे जितका जास्त टीआरपी, तितक्या जास्त जाहिराती आणि तितकाच जास्त महसूल, असे हे समीकरण असते.

टीआरपी वाढवण्यासाठी चॅनेल्सकडून काय केले जाते? चॅनेल्सचे संपूर्ण गणित टीआरपीवर अवलंबून असल्याने तो वाढवण्यासाठी विविध क्लृप्त्या लढवल्या जातात. त्यासाठी एखाद्या चॅनेलवर मनोरंजक गाण्याच्या कार्यक्रमात चित्रपटातील कलाकारांना आमंत्रित केले जाते. तर वृत्तवाहिन्यांवर ब्रेकिंग न्यूज आणि वादळी चर्चा आयोजित करुन जास्तीत जास्त टीआरपी मिळवला जातो.

संबंधित बातम्या: BARC Fake TRP Racket | अडाणी लोकांच्या घरातही इंग्रजी चॅनल, ‘रिपब्लिक’कडून TRP चा खेळ, दोन मालकांना अटक : मुंबई पोलीस

(What is TRP and how does it count)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.