मुंबई : दीपावलीच्या शुभेच्छा (Happy diwali) देताना सणाचा जरूर आनंद घ्या पण आरोग्याच्या जबाबदारीचे भान ठेवा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav thackeray) यांनी राज्यातील नागरिकांना केले आहे. आपण स्वत: देखील केवळ सोशल मीडिया, ईमेलद्वारे शुभेच्छा स्वीकारणार असून भेटीगाठी न करता अतिशय सुरक्षितपणे, घरच्याघरी हा सण साजरा करणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. (What will be the situation of the state after Diwali Chief Minister Uddhav Thackeray hint)