AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lok Sabha Elections 2024 in Maharashtra : महाराष्ट्रात कोणत्या टप्प्यात किती जागांवर मतदान? मुंबई, ठाणे, नागपुरात मतदान कधी?; जाणून घ्या एका क्लिकवर

संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकांचं रणशिंग आता फुंकलं आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद जाहीर घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. महाराष्ट्रातही लोकसभेच्या 48 जागांसाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी होणार असून शेवटच्या अर्थात पाचव्या टप्प्यातील मतदान हे 20 मे रोजी होणार आहे.

Lok Sabha Elections 2024 in Maharashtra : महाराष्ट्रात कोणत्या टप्प्यात किती जागांवर मतदान? मुंबई, ठाणे, नागपुरात मतदान कधी?; जाणून घ्या एका क्लिकवर
| Updated on: Mar 16, 2024 | 6:28 PM
Share

नवी दिल्ली | 16 मार्च 2024 : संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकांचं रणशिंग आता फुंकलं आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद जाहीर घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. 4 जून रोजी मतमोजणी होऊन निकालही जाहीर होईल. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद देऊन ही माहिती जाहीर केली. निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर देशभरात आजपासूनच आचार संहिता लागू झाली आहे.

देशात 97 कोटी मतदार

आपल्या देशात 97.8 कोटीहून अधिक मतदार आहेत. त्यात 49.7 कोटी पुरुष आणि 47.1 कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. तसेच 1.82 कोटी नवीन मतदार आहेत. यंदा 82 लाख प्रौढ मतदार मतदान करणार आहेत. 48 हजार तृतीयपंथीयही मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली.

महाराष्ट्रात ५ टप्प्यांत मतदान, तुमच्याकडे कधी जाणून घ्या..

दरम्यान देशभरात सात टप्प्यांमध्ये मतदान होणार असून महाराष्ट्रातही लोकसभेच्या 48 जागांसाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी होणार असून शेवटच्या अर्थात पाचव्या टप्प्यातील मतदान हे 20 मे रोजी होणार आहे.

महाराष्ट्रात कुठे कधी होणार मतदान ?

पहिला टप्पा 19 एप्रिल 2024

  1. रामटेक
  2.  नागपूर
  3. भंडारा गोंदिया
  4.  गडचिरोली चिमूर
  5.  चंद्रपूर

एकूण 5

दुसरा टप्पा

26 एप्रिल 2024

  1. बुलढाणा
  2.  अकोला
  3. अमरावती
  4.  वर्धा
  5.  यवतमाळ वाशीम
  6.  हिंगोली
  7.  नांदेड
  8.  परभणी

एकूण 8

तिसरा टप्पा

7 मे 2024

  1. रायगड
  2.  बारामती
  3.  धाराशिव
  4.  लातूरॉ
  5.  सोलापूर
  6.  माढा
  7.  सांगली
  8.  सातारा
  9.  रत्नागिरी सिंधुदुर्ग
  10.  कोल्हापूरॉ
  11.  हातकणंगले

एकूण 11

चौथा टप्पा 13 मे 2024

  1. नंदुरबार
  2. जळगाव
  3.  रावेर
  4.  जालना
  5.  संभाजीनगर
  6.  मावळ
  7.  पुणे
  8.  शिरूर
  9.  अहमदनगर
  10.  शिर्डी
  11.  बीड

एकूण 11

पाचवा टप्पा 20 मे 2024

  1.  धुळे
  2.  दिंडोरी
  3.  नाशिक
  4.  पालघर
  5. भिवंडी
  6. कल्याण
  7. ठाणे
  8.  मुंबई उत्तर
  9.  मुंबई उत्तर पश्चिम
  10.  मुंबई उत्तर पूर्व
  11.  मुंबई उत्तर मध्य
  12. मुंबई दक्षिण मध्य
  13.  मुंबई दक्षिण

एकूण 13

राज्यातील एकूण 48 जागांसाठी हे मतदान होणार असून संपूर्ण देशातील मतमोजणीचा निकाल हा 4 जून 2024 लागणार आहे.

Follow Us
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पलटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...