AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालघरमधील साधूंच्या हत्येचं राजकारण, आता बुलंदशहरबाबत अमित शाह गप्प का? : खासदार हुसेन दलवाई

पालघरमधील साधूंच्या हत्येचं भाजपने राजकारण केलं, मात्र आता बुलंदशहरातील साधूंच्या हत्येबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गप्प का? असा सवाल काँग्रेसचे नेते आणि खासदार हुसेन दलवाई यांनी केला आहे (MP Husain Dalwai on Buland Shahar Seer murder).

पालघरमधील साधूंच्या हत्येचं राजकारण, आता बुलंदशहरबाबत अमित शाह गप्प का? : खासदार हुसेन दलवाई
| Updated on: Apr 29, 2020 | 4:32 PM
Share

नवी दिल्ली : पालघरमधील साधूंच्या हत्येचं भाजपने राजकारण केलं, मात्र आता बुलंदशहरातील साधूंच्या हत्येबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गप्प का? असा सवाल काँग्रेसचे नेते आणि खासदार हुसेन दलवाई यांनी केला आहे (MP Husain Dalwai on Buland Shahar Seer murder). तसेच इतर ठिकाणी अशा घटना झाली तर तो गुन्हा आणि भाजपशासित प्रदेशात अशा घटना झाल्या तर तो गुन्हा नाही, असं भाजपचं वर्तन असल्याचा आरोपही त्यांनी केला.

हुसेन दलवाई म्हणाले, “पालघरमधील साधूंची हत्या ही मॉब लिंचिंग नाही. भाजपने आधी मुस्लिमांवर साधूंच्या हत्येचा आरोप करत संशयाचं वातावरण तयार केलं. मात्र, पालघर हत्येमध्ये मुस्लीम सापडले नाहीत. त्यामुळे आता भाजप ख्रिश्चनांवर आरोप करत आहे. पालघरमध्ये भाजपचा सरपंच आणि पदाधिकारी आहेत. सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. सर्व आरोपी भाजपचे कार्यकर्ते निघाले आहेत.”

भाजप धर्माचं आणि जातीचं राजकारण करत आहे असल्याचाही गंभीर आरोप दलवाई यांनी केला. बुलंद शहरामधील घटनेवर सर्व गप्प का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भाजप आपल्या सोयीचं राजकारण करते. बुलंदशहरामधील घटना एका व्यक्तीने घडवून आणली नाही, तर यामागे अनेक व्यक्तींचा हात आहे. उत्तर प्रदेशमध्ये अशा अनेक घटना घडल्या. त्यावर भाजप काहीही बोलत नाही. भाजप आपल्याकडील घटना दाबून दुसऱ्या घटनांकडे बोट दाखवत आहे. बुलंदशहरामधील घटना एका व्यक्तीने केली नाही. यामागे बड्या लोकांचा समावेश आहे. या घटनेचा तपास व्हायला हवा, अशी मागणी दलवाई यांनी केली.

“निधीवाटपाबाबत केंद्र सरकारचा महाराष्ट्र सरकारशी दुजाभाव”

हुसेन दलवाई म्हणाले, “केंद्र सरकार निधी वाटपाबाबत राज्यसरकारसोबत दुजाभाव करत आहे. मोदी सरकारकडून भाजप शासित राज्यांना जास्त निधी आणि गैरभाजप राज्याला कमी निधी दिला जात आहे. केंद्र सरकारने राज्याचे जीएसटीचे पैसे अजुनही दिलेले नाही. ही बाब चुकीची आहे.”

संबंधित बातम्या :

पालघर झुंडीकडून हत्या, योगी आदित्यनाथांचा उद्धव ठाकरेंना फोन, गंभीर, पठाणसह सेलिब्रिटींकडूनही निषेध

उत्तर प्रदेशमध्ये मंदिरात झोपलेल्या 2 साधूंची हत्या, उद्धव ठाकरेंचा योगी आदित्यनाथ यांना फोन

पालघरमध्ये चोर-दरोडेखोर असल्याच्या अफवेतून तिघांची हत्या, 101 आरोपींना पोलीस कोठडी

गृहमंत्री अनिल देशमुख यांची हकालपट्टी करा, भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

संबंधित व्हिडीओ :

MP Husain Dalwai on Buland Shahar Seer murder

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.