Rashid Siddiqui | ‘काहीच अपमानकारक नव्हते’, ‘खिलाडी कुमार’ने 500 कोटींचा दावा ठोकलेल्या यूट्यूबरची प्रतिक्रिया!

अक्षय कुमारने हा दावा मागे घेतला नाही तर त्याच्यावर कायदेशीर कारवाईचा करण्याचा विचार असल्याचे राशिदने म्हटले आहे.

Rashid Siddiqui | ‘काहीच अपमानकारक नव्हते’, ‘खिलाडी कुमार’ने 500 कोटींचा दावा ठोकलेल्या यूट्यूबरची प्रतिक्रिया!
Follow us
| Updated on: Nov 22, 2020 | 3:51 PM

मुंबई : अक्षय कुमारने (Akshay Kumar) नुकताच राशिद सिद्दीकी नावाच्या एका यूट्यूबवर 500 कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. अशा परिस्थितीत आता यूट्यूबर राशिद सिद्दीकी (Rashid Siddiqui) याने याप्रकारणावर आपली बाजू मांडली आहे. राशिद सिद्दीकी यांनी अक्षय कुमारला 500 कोटी देण्यास नकार दिला आहे. राशिद म्हणतो की, त्याने तयार केलेल्या व्हिडीओमध्ये अक्षयला अपमानकारक वाटावे, असे काही नव्हते. तसेच राशिद याने अक्षय कुमारला मानहानीची नोटीस मागे घेण्याचे आवाहन केले आहे. जर, अक्षय कुमारने हा दावा मागे घेतला नाही तर त्याच्यावर कायदेशीर कारवाईचा करण्याचा विचार असल्याचे राशिदने म्हटले आहे (Youtuber Rashid Siddiqui responded to Akshay Kumar’s 500 Crore defamation notice).

राशिदचे वकील जे.पी. जयस्वाल यांनी अक्षय कुमारने केलेले सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. त्याला त्रास देण्यासाठी हे आरोप केले गेले असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. ‘प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. राशिद यांनी अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये काहीही अपमानकारक नाही. निःपक्षपातीपणाचा दृष्टिकोन ठेवून याकडे पहिले जावे’, असा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला आहे.

का संतापला ‘खिलाडी’ कुमार?

बिहारमध्ये राहणारा राशिद सिद्दीकी सिव्हिल इंजिनिअर आहे आणि FF News नावाचा एक यूट्यूब चॅनल चालवतो. राशिदने आपल्या एका व्हिडीओत म्हटलं आहे, “अक्षय कुमार सुशांत सिंह राजपूतला एम. एस. धोनीसारखे मोठे चित्रपट मिळाल्याने खूश नव्हता. अक्षय कुमारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे आणि मुंबई पोलिसांसोबत गुप्त बैठक केली होती. तसेच अक्षय कुमारने रिया चक्रवर्तीला कॅनडाला जाण्यासाठी मदत केली होती.” (Youtuber Rashid Siddiqui responded to Akshay Kumar’s 500 Crore defamation notice)

राशिदच्या याच आरोपांची गंभीर दखल घेत अक्षय कुमारने त्याला बदनामी केल्याप्रकरणी थेट 500 कोटी रुपयांची नुकसान भरपाईची नोटीस पाठवली.

मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल

सुशांत प्रकरणात खोटे आरोप केल्याचं सांगत अक्षय कुमारने यूट्यूबर राशिद सिद्दीकीला 500 कोटी रुपयांच्या बदनामीच्या नुकसान भरपाईची नोटीस पाठवली आहे. यूट्यूबर राशिदने आपल्या यूट्यूर चॅनलवरील एका व्हिडीओत मुंबई पोलीस, आदित्य ठाकरे आणि अक्षय कुमारविरोधात अनेक आरोप केले होते. राशिदने सुशांत सिंह राजपूत प्रकरणी खोटी माहिती पसरवण्यासाठी 15 लाख रुपये घेतल्याचाही आरोप झालाय. याच प्रकरणी मुंबई पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

(Youtuber Rashid Siddiqui responded to Akshay Kumar’s 500 Crore defamation notice)

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.