भावना दुखावल्या, सांगू कोणाला? ‘झोमॅटो’च्या ‘त्या’ रायडरची हतबलता

झोमॅटो कंपनीचा फूड डिलीव्हरी बॉय बिगर हिंदू असल्याचं सांगत जबलपूरमधील ग्राहकाने ऑर्डर रद्द केली होती. त्यानंतर संबंधित रायडरने या घटनेमुळे आपल्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असं सांगितलं.

भावना दुखावल्या, सांगू कोणाला? 'झोमॅटो'च्या 'त्या' रायडरची हतबलता
झोमॅटो आपल्या युजर्सना देतेय ‘अनलिमिटेड फ्री डिलीव्हरी’
Follow us
| Updated on: Aug 01, 2019 | 2:09 PM

जबलपूर : ‘झोमॅटो’च्या बिगर-हिंदू कर्मचाऱ्याकडून पदार्थाची डिलीव्हरी घेण्यास नकार देत जबलपूरमधील ग्राहकाने माज दाखवल्यानंतर सर्वच स्तरातून टीका होत आहे. त्यानंतर संबंधित मुस्लिम डिलीव्हरी एक्झिक्युटिव्हने आपल्या भावना दुखावल्या असल्या, तरी हतबल असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

अमित शुक्ला यांच्यापर्यंत फूड डिलीव्हरी पोहचवण्याची जबाबदारी फैयाज नावाच्या फूड डिलीव्हरी एक्झिक्युटिव्हवर होती. मात्र शुक्ला यांनी डिलीव्हरी बॉय बिगर हिंदू असल्याचं कारण देत ऑर्डर रद्द केल्याचं ट्विटरवरुन जाहीर केलं होतं.

‘भावना दुखावल्या तर गेल्या आहेतच. पण काय बोलणार. लोक जे म्हणतील तेच योग्य असणार. आम्ही गरीब आहोत. सहन तर करावंच लागणार’ अशा भावना फैयाजने व्यक्त केल्या.

‘मी ऑर्डर करणाऱ्या व्यक्तीच्या घराचं लोकेशन जाणून घेण्यासाठी त्यांना (अमित शुक्ला) फोन केला. पण त्यांनी ऑर्डर कॅन्सल केल्याचं सांगितलं.’ असं फैजल म्हणाला.

काय आहे प्रकरण?

‘झोमॅटोवर नुकतीच एक ऑर्डर रद्द केली. त्यांनी मी मागवलेले पदार्थ पोहचवण्यासाठी बिगर हिंदू रायडरची नेमणूक केली होती. त्यांनी रायडर बदलण्यास असमर्थता दर्शवली. ऑर्डर रद्द केल्यास रिफंड देण्यासही नकार दिला. त्यावर, तुम्ही मला डिलीव्हरी घेण्यास जबरदस्ती करु शकत नाही, असं मी म्हटलं. मला परतावा नको. फक्त रद्द करा’ अशा आशयाचं ट्वीट शुक्लांनी मंगळवारी रात्री केलं होतं. टीकेचा सामना करावा लागल्यानंतर त्यांनी ट्विटर अकाऊण्ट डिलीट केलं.

अन्न हाच धर्म

झोमॅटो कंपनी डिलीव्हरी एक्झिक्युटिव्ह न बदलण्याच्या निर्णयावर ठाम राहिली. ‘अन्नाला धर्म नसतो. अन्न हाच एक धर्म आहे’ असं ट्वीट शुक्लांच्या अजब मागणीच्या ट्वीटला उत्तर देताना कंपनीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन करण्यात आलं होतं.

‘सध्या पवित्र श्रावण महिना सुरु आहे. त्यामुळे हा माझ्या वैयक्तिक निवडीचा प्रश्न आहे’ असं सांगत शुक्ला यांनी लंगडं समर्थन करण्याचा प्रयत्न केला.

संस्थापकांचा पाठिंबा

‘झोमॅटो’चे संस्थापक दीपेंदर गोयल यांनी कंपनीच्या निर्णयाला पाठिंबा दाखवला. ‘भारत या संकल्पनेचा आम्हाला अभिमान आहे. आमचे ग्राहक आणि भागिदारांमध्ये असलेल्या विविधतेची आम्हाला जाण आहे. आमच्या तत्त्वांच्या आड आल्याने एखादा व्यवहार गमवावा लागला, तर आम्हाला खेद नसेल.’ अशी भूमिका गोयल यांनी मांडली.

झोमॅटो आणि गोयल यांनी ट्विटरवर मांडलेल्या भूमिकेचं सर्वच स्तरातून स्वागत झालं. तर अमित शुक्ला यांच्या अनाठायी मागणीवर अनेकांनी टीकेची झोड उठवली होती.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.