तुमच्या बेडरूममधून या 3 गोष्टी ताबडतोब फेकून द्या, अन्यथा रात्रीची झोप होऊ शकते खराब
आपण आपल्या बेडरूममध्ये अशा अनेक वस्तू ठेवतो ज्या तिथे नसाव्यात कारण त्या आपल्यासाठी नुकसानकारक ठरू शकतात. चला जाणून घेऊया कोणत्या गोष्टी खोलीबाहेर फेकून द्याव्यात.

घरातील सर्वात आरामदायी जागा म्हणजे आपली बेडरूम. सर्वांसाठीच बेडरूम हा एक कम्फर्ट झोन असतो. जिथे आपल्याला हवे तसे शांत क्षण घालवायला आवडतात. मात्र बऱ्याचदा आपण आपल्याच बेडरुमच्याबाबत अशा काही चुका करतो ज्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो. आपण आपल्या बेडरुममधील काही काही गोष्टींबद्दल सावध असले पाहिजे. खोलीतील काही खास गोष्टी आपल्या आरोग्याच्या शत्रू बनू शकतात. प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमधून याबाबतची एक महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, बेडरूममधील 3 अशा वस्तू ज्या शक्य तितक्या लवकर खोलीतून बाहेर फेकून द्याव्यात. अन्यथा आपल्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.
चला तर मग पाहुयात त्या कोणत्या वस्तू आहेत त्या
1. जुन्या उशा
जुन्या उशांमध्ये धुळीचे कण जमा होतात, ज्यामुळे आपल्याला स्किन ऍलर्जी होऊ शकते. किंवा धुळीमुळे सर्दी होण्याचं प्रमाण वाढतं. तसेच श्वासाचे त्रास होऊ लागतात. जर उशा खूपच जुन्या असतील जसं की एक किंवा दोन वर्ष जुन्या, तर त्या बदलण्याची वेळ आली आहे असं समजा.
2. सिंथेटिक रूम फ्रेशनर
या प्रकारच्या एअर फ्रेशनर्समधून भरपूर प्रमाणात phthalates बाहेर पडतात. त्यामध्ये अस्थिर सेंद्रिय संयुगे (VOCs) देखील असतात, जे श्वसन समस्या आणि हार्मोनल व्यत्ययाशी जोडले गेले आहेत. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की 86 टक्के एअर फ्रेशनर्समध्ये phthalates असतात, ज्याची रसायने प्रजनन कार्याला हानी पोहोचवू शकतात आणि दम्याच्या समस्या देखील वाढवू शकतात. त्याऐवजी सेंटेड तेल किंवा कॅन्डल्स वापरू शकता.
View this post on Instagram
3. जीर्ण झालेली गादी
तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जुनी जीर्ण झालेली गादी जी बेडरूममधून सर्वात आधी काढून टाकावी लागते. जर गादी 7 ते 10 वर्षांपेक्षा जास्त जुनी असेल तर त्यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होऊ शकते आणि पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. शिवाय त्यावरील साठलेले जंतू आपल्या आजाराचं कारण बनू शकतात.
