AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वॉशिंग मशीन नीट चालत नाही? हे 3 खास उपाय देतील जादुई परिणाम!

जर तुमच्या मशीनची कूलिंग कमी झाली असेल, कपडे नीट स्वच्छ होत नसतील, तर चला आम्ही तुम्हाला सांगतो अशा काही सोप्या आणि प्रभावी टिप्स ज्या तुमची वॉशिंग मशीन बनवतील नव्यासारखी...

वॉशिंग मशीन नीट चालत नाही? हे 3 खास उपाय देतील जादुई परिणाम!
washing machineImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jul 06, 2025 | 1:48 PM
Share

आजच्या धकाधकीच्या जीवनात वॉशिंग मशीन ही प्रत्येक घराची गरज बनली आहे. स्वच्छ, चमकदार कपडे मिळावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण, हीच चमक आपल्या कपड्यांत दिसण्यासाठी वॉशिंग मशीनही तितकीच स्वच्छ असणं गरजेचं आहे. अनेकदा आपण कपडे स्वच्छ धुण्यावर भर देतो, पण मशीनच्या साफसफाईकडे दुर्लक्ष करतो आणि हळूहळू मशीनची परफॉर्मन्स कमी होऊ लागते.

तज्ज्ञ सांगतात की, जर वॉशिंग मशीनची योग्य ती देखभाल केली तर ती वर्षानुवर्षे नवनवीन मशीनप्रमाणे कार्यक्षम राहते. चला तर मग जाणून घेऊया वॉशिंग मशीन डीप क्लीनिंगसाठी तज्ञांनी सुचवलेल्या काही खास टिप्स!

1. डीसकेल वापरा

वॉशिंग मशीनमध्ये दररोज वापरल्या जाणाऱ्या पाण्यामुळे आणि डिटर्जंटच्या अंशांमुळे मशीनच्या आतील भागात स्केलिंग म्हणजेच चिकट घाण साचते. ही घाण मशीनच्या कार्यक्षमतेवर परिणाम करते. या समस्येवर उपाय म्हणजे डीसकेल! मार्केटमध्ये liquid आणि powder डीसकेल सहज उपलब्ध आहेत. दर 15 दिवसांनी डीसकेल टाकून एक रिकामा वॉश सायकल चालवला, तर मशीन आतून चकाचक होते. ही प्रक्रिया तुम्ही घरीच करू शकता, यासाठी कोणत्याही प्रोफेशनलची गरज नाही.

2. हार्ड सर्व्हिस

जर तुमची वॉशिंग मशीन खूप जुनी आहे आणि तिची अनेक वर्षे सर्व्हिस झाली नसेल, तर डीसकेलने ती नीट स्वच्छ होईलच असं नाही. अशावेळी हार्ड सर्व्हिस हा उत्तम पर्याय आहे. हार्ड सर्व्हिसमध्ये संपूर्ण मशीन उघडून, प्रत्येक भागाची डीप क्लीनिंग केली जाते. या प्रक्रियेत काही विशेष केमिकल्स वापरले जातात, जे मशीनच्या कोपऱ्यात लपलेलीही घाण काढून टाकतात. लोकल टेक्निशियन किंवा ब्रँड सर्व्हिस प्रोफेशनल यांच्याकडून ही सेवा घेतली जाऊ शकते. हार्ड सर्व्हिस केल्यानंतर तुमचं मशीन पुन्हा नव्यासारखं दिसू शकतं.

3. वॉटर सॉफ्टनर

जर तुमचं मशीन नविन किंवा मध्यम वयोगटातलं असेल, तर वॉटर सॉफ्टनर वापरून तुम्ही त्याची लाइफ वाढवू शकता. वॉटर सॉफ्टनर हे अशा उपकरणांना म्हणतात जे machine मध्ये येणाऱ्या पाण्यातील क्षार कमी करतात, ज्यामुळे स्केलिंग होतं. वॉटर सॉफ्टनरचा वापर फक्त fully automatic वॉशिंग मशीनसाठी होतो आणि तो मशीनच्या पाण्याच्या इनलेटवर लावला जातो. याच्या वापरामुळे मशीनच्या इंटर्नल पार्ट्सचे नुकसान कमी होते, आणि मशीन अनेक वर्ष टिकते.

जर तुम्हाला तुमची वॉशिंग मशीन नेहमी नवीसारखी चालवायची असेल, तर तिची देखभाल करणे गरजेचे आहे. डीसकेलने नियमित साफसफाई, वेळोवेळी हार्ड सर्व्हिस आणि वॉटर सॉफ्टनरचा वापर केल्यास तुमची मशीन आणि कपडे दोन्ही ‘चमकतील’

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.