रानटी वनस्पती समजून दुर्लक्ष करू नका! रस्त्याच्या कडेला दिसणाऱ्या या 8 औषधी वनस्पतींचा आयुर्वेदात केला जातो वापर, नाव काय? वापर कसा करावा?
शेताच्या बांधावर, रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या जागेत उगवणाऱ्या अनेक वनस्पतींकडे आपण रानटी गवत म्हणून पाहतो. मात्र त्यातील काही वनस्पतींचा वापर भारतीय पारंपरिक आरोग्यपद्धती आणि आयुर्वेदात केला जातो.

शेताच्या बांधावर, रस्ताच्या कडेला किंवा मोकळ्या जागेत उगवणाऱ्या अनेक वनस्पतींकडे आपण साधं रानटी गवत म्हणून पाहतो. पण यातील काही वनस्पतींचा वापर भारतीय पारंपारिक उपचारपद्धती आणि आयुर्वेदात अनेक वर्षांपासून केला जातो. विशेष म्हणजे यातील काही वनस्पती घराच्या बागेत किंवा कुंडीतही वाढवता येतात.
अडुळसा
अडुळसा ही रस्त्याच्या कडेला असणारी आणि सहज ओळखू येणारी वनस्पती आहे. याची पाने लांबट झुडुपासारखी असतात. आयुर्वेदामध्ये याचा वापर विशेषत: श्वसनाच्या संबंधित उपांयामध्ये केला जातो. कफ किंवा खोकला लागल्यावर सिरप पिण्याऐवजी अडुळशाच्या पानांचा रस प्यायला जातो.
कडुनिंब
घराच्या अंगणात, शेताच्या बांधावर, रस्त्याच्या कडेला कडुनिंबाची झाडे हमखास दिसतात. कडुनिंबाच्या मुळापासून ते पानापर्यंत याचा सर्वच गोष्टीत वापर केला जातो.त्यामुळे कडुनिंब अतिशय गुणकारी मानले जाते. त्वचेचे इंफेक्शन, केसांची वाढ, त्वचेचा ग्लो वाढवणे, यासाठी कडुनिंबाचा वापर केला जातो. कडुनिंबाची पाने घरात ठेवल्याने नकारात्मकता दूर होते. घरात रोग,किड जीवजंतू फार काळ टिकत नाही.
तुळस
तुळस फक्त धार्मिक कारणांसाठी घरात ठेवली जाते असं नाही. भारतीय पारंपरिक आरोग्यपद्धतीत तुळशीला विशेष महत्त्व आहे. गावाकडील घरांच्या अंगणात, शेताजवळ तुळशीची रोपं सहज आढळतात. तुळशीच्या पानांचा वापर सर्दी, खोकला, घशाशी संबंधित उपायांमध्ये केला जातो. त्यामुळे बाकी काही लावता येणं शक्य नसलं तरी कुंडीत तुळस लावता येते त्यामुळे ती लावू शकता.
भुईआवळा
भुईआवळा ही जमिनीवर वाढणारी छोटी वनस्पती आहे. पावसाळ्यात किंवा ओलावा असणाऱ्या ठिकाणी ती दिसून येते. नावात आवळा असला तरी ही वनस्पती नेहमीच्या आवळ्याच्या झाडापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. आयुर्वेदात भुईआवळ्याचा वापर यकृताशी संबंधित आजारांवर वापर केला जातो.
पुनर्नवा
पुनर्नवा ही मोकळ्या जागेत आणि शेतीच्या परिसरात आढळणारी वनस्पती आहे. जमिनीलगत पसरत जाणारी तिची वाढ आणि विशिष्ट पानं यामुळे ती ओळखता येते. आयुर्वेदात पुनर्नवाचा वापर हा शरीरातील द्रवसंतुलन, सूज आणि मूत्रविषयक आजारांवर मात करण्यासाठी केला जातो.
ब्राम्ही
ब्राम्हीची वाढ ही ओलसर ठिकाणी आणि पाण्याच्या आसपासच्या ठिकाणी होते . त्यामुळे शेतीच्या परिसरात,ओलसर जमिनीवर आणि पाणथळ जागांवर ही औषधी वनस्पती आढळते. स्मरणशक्ती सुधारण्यासाठी, सौंदर्यप्रसाधनाच्या गोष्टिंसाठी आणि मानसिक शांतता राखण्यासाठी ब्राम्हीचा वापर केला जातो.
आघाडा
आघाडा ही मोकळ्या जागेत, रस्त्याच्या कडेला आणि शेताच्या बांधावर सहज दिसणारी वनस्पती आहे. ग्रामीण भागात ही वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळते. दमा किंवा श्वसनाचे आजार असलेल्या लोकांनी याचे सेवन करावे असे सांगितले जाते. याच्या पानांचा रसाचा वापर अपचन, पोटफुगी, गॅस , बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी केला जातो
