फ्रिज वापरताना 99 टक्के लोक करतात ही चूक; पडते खूप महागात, होऊ शकतो मोठा स्फोट
उन्हाळ्यामध्ये अनेकदा एसीचा स्फोट झाल्याच्या घटना आपण ऐकल्या असतील, मात्र तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या घरी असणाऱ्या फ्रिजचा देखील असाच स्फोट होऊ शकतो. हा स्फोट इतका शक्तिशाली असतो, की यामध्ये तुमच्या घराचं मोठं नुकसान होऊ शकतं.

उन्हाळ्यामध्ये अनेकदा एसीचा स्फोट झाल्याच्या घटना आपण ऐकल्या असतील, मात्र तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या घरी असणाऱ्या फ्रिजचा देखील असाच स्फोट होऊ शकतो. हा स्फोट इतका शक्तिशाली असतो, की यामध्ये तुमच्या घराचं मोठं नुकसान होऊ शकतं. अनेकदा फ्रिजला आग लागल्याच्या घटना देखील घडतात. अलिकडच्या काळात फ्रिजमध्ये स्फोट होण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. जर तुमचं फ्रिज नवं असेल तर तुलनेनं स्फोट होण्याची रिस्क ही कमी असते. मात्र जर तुमचं फ्रिज हे दहा ते पंधरा वर्ष जुनं असेल तर स्फोट होण्याचा धोका देखील जास्त असतो. अनेकदा फ्रिज चुकीच्या पद्धतीनं हातळल्यामुळे देखील फ्रिजचा स्फोट होतो, चला तर मग जाणून घेऊयात फ्रिज वापरताना काय काळजी घेतली पाहिजे?
फ्रिजला आग लागण्याचे अनेक कारणं असू शकतात, काही लोक फ्रिज चुकीच्या पद्धतीनं हाताळतात. फ्रिज 24 तास सुरू असतं त्यामुळे फ्रिज प्रचंड प्रमाणात गरम होतं, अशा स्थितीमुळे फ्रिजला आग लागून स्फोट होण्याचा धोका वाढतो. जर तुमचं फ्रिज जुनं झालं असेल तर त्याच्या कम्प्रेसरवर दाब वाढतो. त्यामुळे त्याचा स्फोट होऊ शकतो.
अनेक लोक फ्रिजमध्ये त्याच्या कॅपिसिटीपेक्षा जास्त सामान ठेवतात. त्यामुळे फ्रिजमध्ये जाण्यासाठी हवेला जागा राहात नाही. हवा आत न गेल्यामुळे फ्रिज गरम होतं आणि त्याचा स्फोट होतो, दुसरीकडे जर तुमचं फ्रिज वारंवार गरम होत असेल तर त्यामुळे त्यातील सामान देखील खराब होण्याचा धोका असतो.
काही लोक फ्रिजचं सॉकेट आणि प्लग या डूब्लिकेट वापरतात, यामुळे कधी-कधी शॉर्ट सर्किट होतो. शॉर्ट सर्किटमुळे तुमच्या फ्रिजला आग लागण्याची घटना घडू शकते. स्फोट देखील होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही जिथे फ्रिज लावणार आहात, तिथे आधी सर्व गोष्टींची काळजीपूर्वक पाहाणी केली पाहिजे.
जर कुठेही तुमच्या फ्रिजची आदळ -आपट झाली असेल आणि तुमच्या फ्रिजमधील कुलिंग गॅस जर लिक झाला तर ही सर्वात खतरनाक अवस्था असते. यामुळे लगेचच तुमच्या फ्रिजला आग लागू शकते.
