Weight loss trick: पटकन वजन कमी करायचे? मग करा हा उपाय
जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर स्टेयर क्लाइंबर तुमच्या फिटनेस रूटीनमध्ये नक्कीच समाविष्ट करा. ही मशीन फक्त कॅलरीज बर्न न करता संपूर्ण शरीर फिट ठेवण्यास मदत करते. त्यामुळे व्यायामाचा जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी स्टेयर क्लाइंबरचा योग्य वापर करा आणि निरोगी जीवनशैली जगा.

जिममध्ये जाणाऱ्यांचे मुख्य लक्ष फक्त फिटनेसवर असते. फॅट कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या व्यायामाचा अवलंब करतात, तासंतास घाम गाळतात, तरीही त्यांचे फॅट कमी होत नाहीत. तुम्हीही जिममध्ये तासंतास मेहनत करूनही वजन कमी करण्यात अयशस्वी ठरत असाल, तर तुमच्या एक्सरसाइज रूटीनमध्ये एक साधा आणि परिणामकारक बदल करणे आवश्यक आहे.
तुम्हाला माहीत आहे का, स्टेयर क्लाइंबर मशीन तुमच्या व्यायामात सामावून घेतल्यास ते केवळ कॅलोरीज बर्न करत नाही, तर शरीरातील फॅट कमी करण्यातही अत्यंत प्रभावी आहे. चला तर मग, जाणून घेऊया स्टेयर क्लाइंबर मशीनचे फायदे आणि ते कसे कार्य करते!
स्टेयर क्लाइंबर मशीन म्हणजे काय?
स्टेयर क्लाइंबर ही एक फिटनेस मशीन आहे, जी व्यायाम करताना पायऱ्या चढल्यासारखा अनुभव देते. या मशीनचा उपयोग पाय, मांड्या आणि हृदयाच्या आरोग्याला फायदेशीर असतो. जिममध्ये नवशिक्यांपासून ते प्रोफेशनल्सपर्यंत सर्वांसाठी ही मशीन उपयुक्त आहे. चला, जाणून घेऊया स्टेयर क्लाइंबरचे फायदे:
स्टेयर क्लाइंबरचे ५ प्रमुख फायदे
१. जर स्टेयर क्लाइंबरवर फक्त 30 मिनिटे व्यायाम केल्याने 300 ते 500 कॅलोरीज बर्न होतात व वजन जलद कमी होते
२. नियमित वापराने पाय आणि पाठीवरील अतिरिक्त फॅट कमी होऊन शरीराला आकार मिळतो.
३. या मशीनवर व्यायाम केल्याने तुमचे कोर मसल्स (पोट) मजबूत होतात.
४. स्टेयर क्लाइंबर एकाच वेळी कार्डियो आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग दोन्हीचे फायदे देतो.
५. नियमित व्यायामाने शरीराची सहनशक्ती वाढते आणि संतुलन सुधारते.
स्टेयर क्लाइंबरचा योग्य वापर कसा कराल?
१.आधी 5-10 मिनिटं हळुहळु चाला, ज्यामुळे शरीर गरम होईल.
२.शरीर सरळ ठेवा, मशीनच्या हँडलवर जास्त झुकू नका.
३.कोर आणि पाठीच्या स्नायूंवर लक्ष केंद्रित करा.
४.थोड्या वेळानी हळूहळू स्पीड वाढवा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
