केसांच्या समस्येमुळे त्रस्त आहात? मग एकदा कोरफडीचे तेल वापरून पाहा…

अनेक महिला आणि पुरुष केस गळतीची समस्येमुळे त्रस्त (Common Cause of Hair Loss) आहेत.

केसांच्या समस्येमुळे त्रस्त आहात? मग एकदा कोरफडीचे तेल वापरून पाहा...
केस गळती

मुंबई : अनेक महिला आणि पुरुष केस गळतीची समस्येमुळे त्रस्त (Common Cause of Hair Loss) आहेत. सुरुवातीला केस गळायला लागल्यावर आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र, त्यानंतर केस गळतीची समस्या वाढते आणि हळूहळू टक्कल पडायला सुरूवात होते. काही ठराविक वयानंतर केस गळणे ही सामान्य बाब आहे. (Aloe vera oil is useful for hair)

आपल्या नियमित सवयींमुळे केस गळतीचे प्रमाणात वाढते. मात्र, तुम्हीही केस गळतीमुळे त्रस्त असाल तर हे उपाय केले तर तुमची केस गळती थांबू शकते. आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी कोरफड खूप उपयुक्त आहे. कोरफडचे तेल घरी तयार करून केसांना लावले तर केस गळतीची समस्या दूर होऊ शकते.

-जर तुमचे केस वाढत नसतील तर कोरफडीचे तेल केसांना लावा. यामुळे केसांची वाढ चांगली होते.

-केस गळती रोखण्यासाठी कोरफडीचे तेल खूप चांगले आहे. कारण त्यामध्ये ए, सी आणि ई जीवनसत्त्वे असतात.

-तुमचे केस खूप पातळ झाले असतील तर तुम्ही कोरफडीचे तेल लावा दोन ते तीन महिन्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल.

कोरफडीचे तेल तयार करण्याची पध्दत
कोरफडीचे तेल बनविणे खूप सोपे आहे, कोणीही ते सहज घरी तयार करू शकते. हे तेल तयार करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा खर्च देखील येत नाही. ताजी कोरफड द्या आणि अर्धा कप डोक्याला लावण्याचे नारळाचे तेल घ्या. कोरफड स्वच्छ करून घ्या. त्यानंतर कोरफडीचा बाजूचे काट्याचे भाग चाकूने काढून टाका काढलेली कोरफड आणि तेलाची चांगली पेस्ट करून घ्या त्यानंतर त्यानंतर हे तेल एका बाॅटलमध्ये टाका आणि रोज हे तेल केसांना लावा.

मॉइश्चरायजर
कोरफडमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा कोरडी पडते. यावेळी कोरफड जेलचा वापर मॉइश्चरायजरसारखा करू शकता. कोरफड जेल तुम्ही नखांनाही लावू शकता. हे जेल नखांनासुध्दा मॉइश्चरायज करून मजबूत आणि चमकदार बनवेल.

संबंधित बातम्या : 

(Aloe vera oil is useful for hair)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI