
कोरफड जेलमध्ये अनेक गुणधर्म आहेत जे तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. जर तुम्हाला त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या असेल, तर अशावेळी तुमच्या रोजच्या स्किन केअन रूटिंग मध्ये कोरफड जेलचा समावेश करणे हा एक चांगला उपाय ठरू शकतो. याशिवाय केसांच्या कोणतीही समस्या असली तर तुम्ही बाजारातील कॅमिकेलयुक्त प्रॉडक्टचा वापर करतात. पण कालांतराने यांचे दूष्परिणाम दिसून येतात. अशावेळीस कोरफड जेल तुम्ही वापरल्यास केस निरोगी बनवण्यास देखील मदत करतात. त्यामुळे घरी कोरफड जेल कशी बनवण्याची व दिर्घकाळ साठवून कशी ठेवायची हे जाणुन घेऊया…
तुम्हाला जर अगदी घरगुती पद्धतीने कोरफड जेल बनवायची असल्यास सर्वात प्रथम कोरफडीचे ताजे पान घ्या आणि ते कापून घ्या. पानाचा हिरवा भाग वेगळा करून चमच्याच्या मदतीने जेल एका भांड्यात काढा. आता मिक्सरमध्ये कोरफडीचे जेल टाका आणि चांगले बारीक करा. जेल जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी, तुम्ही त्यात थोडे गुलाबजल मिक्स करू शकता.
कोरफड जेल कसे साठवायचे?
तुम्ही तयार केलेली घरगुती कोरफड जेल कोणत्याही कंटेनरमध्ये साठवून ठेऊ शकता. मात्र हे लक्षात ठेवा की कंटेनर हवाबंद आहे की नाही. त्याचबरोबर कंटेनर सुर्यप्रकाशापासून दूर थंड वातावरण असेल त्या ठिकाणी ठेवा. तुम्हाला हवे असल्यास कंटेनरमध्ये ठेवलेले कोरफड जेल रेफ्रिजरेटरमध्ये देखील ठेवू शकता. तुम्ही जर या टिप्स फॉलो केल्यास जेल बराच काळ टिकून राहिल.
तुम्हाला कोरफड जेलचे असे मिळतील फायदे
कोरफडीच्या जेलमध्ये दाहक-विरोधी, जीवाणूरोधी आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात. तज्ञांच्या मते, कोरफड जेल तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. कोरडी त्वचा, मुरुमे, सन टॅनिंग यासारख्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही कोरफड जेल वापरू शकता. याशिवाय ते तुमच्या केसांना पोषण देण्यासाठी व मऊ सिल्की आणि मजबूत बनवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. याचे कोणतेही दुष्परिणाम तुमच्या त्वचेवर आणि केसांवर होत नाही.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)