Surya Mudra Benefits: योगामधील ‘ही’ मुद्रा केल्यास लठ्ठपणापासून कोलेस्ट्रॉलपर्यंत सर्व समस्या होतील दूर…

Yoga Health Benefits: योग ही एक प्राचीन कला आहे जी वजन कमी करण्यास आणि तंदुरुस्त राहण्यास मदत करते. सूर्यमुद्रा तुमचं वाढलेलं वजन कमी करते, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते आणि पचनसंस्था सुधारते. सूर्य मुद्रा दररोज 5-15 मिनिटे केल्यास तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतील.

Surya Mudra Benefits: योगामधील ही मुद्रा केल्यास लठ्ठपणापासून कोलेस्ट्रॉलपर्यंत सर्व समस्या होतील दूर...
| Edited By: | Updated on: Feb 14, 2025 | 3:51 PM

निरोगी आरोग्यासाठी उत्तम आहार आणि योग्य व्यायाम करणे गरजेचे असते. परंतु, योग फक्त वजन कमी करण्यासाठी आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठीचा व्यायाम नाही तर ती एक प्राचीन कला देखील आहे. योगा संतांच्या ज्ञानाला आधुनिक विज्ञानाशी जोडते आणि आपल्याला आरोग्यदायी फायदे प्रदान करते. योगामध्ये केवळ आसनेच समाविष्ट नाहीत तर मुद्रा देखील महत्त्वाची भूमिका बजावतात. या योगासनांमुळे तुम्हाला अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात. प्रत्येक योगासन विशिष्ट असते आणि ते दररोज योग्यरित्या केले पाहिजे. प्रत्येक योगासनात एक खोल रहस्य लपलेले असते. जर तुम्ही या मुद्रा नियमितपणे केल्या तर तुमच्या शरीरात गॅस तयार होण्याची समस्या देखील दूर होईल. योगा नहमी शांततेत आणि एकटे बसून करावी ज्यामुळे तुमच्या आरोग्याला त्याचा फायदा होईल.

योगसाधकांसाठी मुद्रा विज्ञान खूप महत्वाचे आहे. काही योग तज्ञ या आसनाला ‘हस्त योग’ असेही म्हणतात. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी, विविध योगासन आणि प्राणायामांसोबत या मुद्रांचा सराव करणे देखील महत्त्वाचे आहे. योगासनांचा सराव केल्याने शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक फायदे मिळतात. योगामध्ये अनेक प्रकारच्या आसनांचे वर्णन केले आहे. आज आपण येथे सूर्यमुद्रा करण्याचे फायदे जाणून घेऊया.

आपले शरीर पाच तत्वांनी बनलेले आहे: पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश. शरीर निरोगी ठेवण्यासाठी या घटकांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. योगातील मुद्रा विज्ञानाद्वारे आपण या पाच तत्वांवर नियंत्रण ठेवू शकतो. या घटकांवर हाताच्या बोटांनी आणि अंगठ्याच्या मदतीनं नियंत्रित केले जाऊ शकत. सर्वप्रथम, अनामिका बोट वाकवून, अनामिका बोटाच्या टोकाने अंगठ्याच्या टोकाला स्पर्श करा. आता अंगठ्याने अनामिका बोट हलके दाबा.

अशाप्रकारे अग्नि किंवा सूर्य मुद्रा तयार होते. ही मुद्रा दररोज 5 ते 15 मिनिटे केल्यास फायदे होतील. सूर्य मुद्रा मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरते. सूर्य मुद्रा केल्यामुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहाण्यास मदत होते. तुम्हाला जर थायरॉईडच्या समस्या असतील तर तुमच्यासाठी सूर्य मुद्रा फायदेशीर ठरू शकते.

सूर्य मुद्रा करण्याचे फायदे:

सूर्य मुद्रा लठ्ठ लोकांचं वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी सूर्य मुद्रा उपयुक्त ठरते.

सूर्य मुद्रा केल्यामुळे पोटासंबंधित समस्या दूर होतात आणि पचनसंस्था सुधारते.

सूर्य मुद्रा केल्यामुळे मनामधील भीती, दुःख आणि ताण निघून जाण्यास मदत होते.