‘या’ चार फळ-भाज्यांसोबत मुळा खाणे टाळाच, अन्यथा आरोग्याच्या समस्या उद्भवतील!

मुळा खाणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप फायदेशीर आहे.

'या' चार फळ-भाज्यांसोबत मुळा खाणे टाळाच, अन्यथा आरोग्याच्या समस्या उद्भवतील!
मुळा

मुंबई : मुळा खाणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप फायदेशीर आहे. मुळ्यात फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह आणि अँथोसायनिन्स सारखे पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. याव्यतिरिक्त, मुळामध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील आहेत, ज्यामुळे पोट, आतडे, मूत्रपिंड, मधुमेह ते कर्करोगापर्यंतच्या समस्यांपासून आराम मिळतो. (Avoid eating radish with four vegetables)

पराठे, लोणचे, सलाद आणि भाजीमध्ये मुळ्याचा वापर केला जातो. मात्र, आयुर्वेदानुसार काही फळ-भाज्यांसोबत मुळा खाणे टाळले पाहिजे. कारण मुळ्या आणि काही फळ-भाज्यांसोबत खाल्ल्याने आपल्या पोटात विष देखील तयार होऊ शकते. नेमक्या या फळ-भाज्यांसोबत कोणत्या हे आपण जाणून घेऊयात.

संत्री
जर आपण मुळा खाल्ला असेल तर काही तास संत्री खाऊ नका. या दोघांचे मिश्रण विषासारखेच मानले जाते, यामुळे पोटामध्ये अनेक समस्या उद्भवू शकतात आणि आपले पचन पूर्णपणे खराब करू शकते. जर आपण संत्री खाल्ली असेल तर साधारण दहा तास आपण मुळ्याचे सेवन करणे टाळले पाहिजे.

काकडी
लोक बर्‍याचदा कोशिंबीरमध्ये काकडी आणि मुळा बारीक करून टाकतात. त्यांना वाटते की, हे आपल्या शरीरासाठी चांगले आहे. मात्र, हे आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे. काकडीमध्ये एस्कॉर्बिनेज आढळते, जे व्हिटॅमिन सी शोषून घेण्याचे कार्य करते. अशा परिस्थितीत एकाचवेळी काकडी किंवा मुळा खाणे धोकादायक आहे.

कारले
जरी कारले अनेक रोगांवर गुणकारी असले तरी देखील मुळा आणि कारलेसोबत खाऊ नये. मुळा आणि कारलेसोबत खाल्ल्याने पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच श्वसनाच्या समस्या उद्भवू शकतात. हृदयविकाराचा धोका देखील वाढतो. जर तुम्ही कारले खाल्ले असेल तर किमान 24 तास मुळा खाऊ नका.

दूध
जर आपण मुळा खात असाल तर दुधापासून तयार झालेले पदार्थ खाणे टाळा. मुळा आणि दूधसोबत खाल्ले तर त्वचेच्या अनेक समस्या देखील उद्भवू शकतात. त्यांच्यामध्ये कमीतकमी चार तासांचे अंतर असले पाहिजे. तसेच मुळा आणि दूधसोबत घेतले तर गॅसची समस्या निर्माण होऊ शकते.

संबंधित बातम्या : 

(Avoid eating radish with four vegetables)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI