विमान प्रवासापूर्वी हे पदार्थ चुकूनही खाऊ नका, नाहीतर..

बरेच लोक फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी स्नॅक्स खातात, परंतु ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकते. विमान प्रवासापूर्वी कोणते पदार्थ खाऊ नयेत, ते जाणून घेऊया.

विमान प्रवासापूर्वी हे पदार्थ चुकूनही खाऊ नका, नाहीतर..
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Mar 28, 2023 | 2:46 PM

नवी दिल्ली : विमान (flight journey) प्रवासाची एक वेगळीच मजा असते. विमानात प्रवास करताना खिडकीची सीट मिळाली तर आणखीनच मजा येते. पण काहीही न खाता फ्लाइटमध्ये प्रवास करणे धोकादायक ठरू शकते. पण हाच नियम जास्त अन्न खाण्यालाही तितकाच लागू होतो. बरेच लोक फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी क्विक स्नॅक्स (snacks) खातात, परंतु ते तुमच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरू शकते. आरोग्य तज्ञांच्या मते, क्विक स्नॅक्समुळे तुम्हाला अपचन, मळमळ किंवा ब्लोटिंग (bloating, gas, acidity) अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

विमानात बसण्यापूर्वी कोणते पदार्थ चुकूनही खाऊ नयेत, हे जाणून घेऊया.

सफरचंद

‘ ॲन ॲपल अ डे किप्स दि डॉक्टर अवे’ (An apple a day, keeps the doctor away) ही म्हण तर आपण सर्वांनीच ऐकली असेल. तसं पहायला गेलं तर सफरचंद आरोग्यासाठी अत्यंत आरोग्यदायी मानले जाते. मात्र असे असले तरी ते धोकादायकही ठरू शकते. सफरचंदात फायबर मुबलक प्रमाणात आढळते, जे पचण्यास कठीण असते. यामुळे तुम्हाला ॲसिडिटी किंवा गॅसची समस्या होऊ शकते. सफरचंदांमध्ये साखरेचे प्रमाण देखील आढळते, जे तुमच्या आतड्याच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते. त्यामुळे विमानाने प्रवास करायचा असेल तर सफरंचद खाणे टाळा. त्याऐवजी उड्डाण करण्यापूर्वी तुम्ही पपई किंवा संत्र यासारखी फळे खाऊ शकता.

तळलेले पदार्थ

विमानतळावर अनेक आकर्षक पदार्थ पाहून आपण अनेकदा भारावून जातो. तळलेल्या अन्नामध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असते. उड्डाण करण्यापूर्वी बर्गर किंवा फ्रेंच फ्राईज खाल्ल्याने तुम्हाला हार्ट बर्न होऊ शकते. म्हणून असे पदार्थ खाणे टाळावे.

तेलकट पदार्थ

फ्लाइटमध्ये प्रवास करण्यापूर्वी गरम सॉस, बिर्याणी, पराठे आणि लोणचे यासारखे तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते. यामुळे तुम्हाला हृदयाची जळजळ आणि ब्लॅडर इरिटेशन होण्याची समस्या देखील होऊ शकते. या पदार्थांमध्ये जास्त कॅलरीज असतात, ज्यामुळे तुमच्या तोंडातून वास येऊ शकतो.

ब्रोकोली

ब्रोकोलीचा तुमच्या रोजच्या आहारात समावेश करणे आवश्यक आहे, परंतु विमान प्रवासापूर्वी ते खाणे आरोग्यदायी मानले जात नाही. फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी तुम्ही कधीही कच्च्या भाज्या किंवा सॅलॅड खाऊ नये कारण यामुळे अपचन आणि अस्वस्थता होऊ शकते.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.