AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Common Mask Mistakes | कोरोनापासून स्वतःचा बचाव करायचाय, तर मास्क लावताना ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

भारतात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा (Corona Virus) कहर पाहायला मिळतो आहे. गेल्या 24 तासात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 2 लाखाहून अधिक नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

Common Mask Mistakes | कोरोनापासून स्वतःचा बचाव करायचाय, तर मास्क लावताना ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा!
मास्क
| Edited By: | Updated on: Apr 17, 2021 | 8:45 AM
Share

मुंबई : भारतात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा (Corona Virus) कहर पाहायला मिळतो आहे. गेल्या 24 तासात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 2 लाखाहून अधिक नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. एकीकडे सरकार लोकांना लस घेण्यासाठी आवाहन करत आहे, तर दुसरीकडे कोरोना संसर्गाची प्रकरणे गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढत आहेत. अशावेळी मास्क घालणे अनिवार्य झाले आहे. मुखवटा घालताना कोणत्या चुका करु नयेत, ते आपण जाणून घेऊया…(Avoid these Common Mask Mistakes to stay safe from corona)

मास्क परिधान करताना ‘या’ चुका टाळा

जरी बरेच लोक असे आहेत की, जे मास्क घालतात, परंतु त्यांना मास्क घालण्याचा योग्य मार्ग आणि तो वापरण्याची योग्य पद्धत माहित नाही. यामुळे ते अशा काही चुका करतात, ज्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो आणि मास्क घातल्यानंतरही ते संसर्गाला बळी पडतात. म्हणून मास्क परिधान करताना ‘या’ चुका कटाक्षाने टाळल्या पाहिजेत.

मास्कला वारंवार स्पर्श करणे

अनेकदा आपण लोकांना पाहिले आहे की, मास्क घातल्यानंतर ते त्यास पुन्हा पुन्हा स्पर्श करत असतात. कधीकधी नाकातून किंवा कधी तोंडाच्या बाजूने ते मास्क सरळ करत राहतात. ही सर्वात मोठी चूक आहे. मास्कच्या बाहेरील भागात संसर्ग पसरवणारे व्हायरस असू शकतात, म्हणून मास्कला वारंवार स्पर्श करू नका. तसेच, पुन्हा पुन्हा मास्क काढ-घाल करू नये. कारण, जर आपण मास्क काढून टाकला आणि संक्रमित झालेल्या जागी ठेवला, तर पुन्हा तो परिधान केल्याने ते संक्रमण नाक आणि तोंडातून शरीरात प्रवेश करू शकतात.

मास्क घालून नाक उघडे ठेवणे

असे बरेच लोक आपण पाहिले असतील, जे मास्क घालतात आणि तोंड झाकतात, पण त्यांचे नाक मात्र खुलेच असते. अमेरिकेच्या सीडीसीच्या (सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन) मते, आपण असा फेस मास्क घातला पाहिजे, ज्याने आपले नाक, तोंड तसेच हनुवटी संपूर्ण झाकली गेली पाहिजे. मास्क चेहऱ्यावर चांगले फिट बसले पाहिजे, जेणेकरून त्यात मोकळे अंतर राहणात नाही. आपण मास्क व्यवस्थित घातला नाही, तरीही संसर्ग होण्याचा धोका आहे (Avoid these Common Mask Mistakes to stay safe from corona).

मास्क घालण्यापूर्वी आणि काढल्यानंतर हात न धुणे

आपल्या चेहर्‍याला किंवा मास्कला स्पर्श केल्यानंतर, आपण प्रत्येक वेळी आपले हात स्वच्छ धुवावेत. मास्क घालण्यापूर्वी आणि तो काढण्यापूर्वी साबणाच्या पाण्याने किंवा सॅनिटायझरने हात पूर्णपणे स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे. मास्क घालण्यापूर्वी हात धुतल्यामुळे हे सुनिश्चित होईल की, मास्कवर कोणत्याही प्रकारचे संक्रमण नाही. तर, मास्क काढून टाकल्यानंतर आपले हात धुणे आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या हातावर असलेले विषाणू नष्ट होतील.

मास्क नीट स्वच्छ न करणे

केवळ मास्क परिधान करणे पुरेसे नाही, परंतु स्वच्छ आणि साफ मास्क घालणे महत्वाचे आहे. आपण डिस्पोजेबल मास्क वापरत असल्यास याचा काही फरक पडत नाही. परंतु, जर आपण फॅब्रिकसह रीयूज मास्क वापरत असाल, तर गरम पाण्याने आणि डिटर्जंटने ते चांगले स्वच्छ करा आणि नंतर उन्हात व्यवस्थित वाळवा. वारंवार न धुता मास्क घालण्याने संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

ओला मास्क घालणे

उन्हाळ्याच्या हंगामात अनेकदा घामामुळे परिधान केलेला मास्क ओला होऊ शकतो. जर मास्क ओला झाला असेल, तर तो त्वरित बदला. डब्ल्यूएचओचेने देखील असे म्हटले आहे की, ओला मास्क कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी अजिबात प्रभावी ठरणार नाही. म्हणूनच जर मास्क ओळ झाला असेल, तर तो लगेच बदला.

(टीप: कोणताही उपाय करण्यापूर्वी नेहमीच एखाद्या विशेषज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

(Avoid these Common Mask Mistakes to stay safe from corona)

हेही वाचा :

थकवा, सांधेदुखी ते थंडी, दुर्लक्ष करु नका! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नवी लक्षणे कोणकोणती?

कोरोना पॉझिटीव्ह आईदेखील करू शकते नवजात बाळाला स्तनपान, जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात…

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.