AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलींनो मेकअप नक्की करा पण ते करताना ‘या’ चुका टाळा!

मेकअप करायच्या देखील स्टेप्स आहेत. त्या फॉलो केल्या तरच मेकअप छान होतो आणि त्वचा देखील छान राहते. जर या स्टेप्स मागे पुढे झाल्या तर चेहरा खराब होऊ शकतो आणि आपण जे पैसे मेकअपच्या प्रोडक्ट्सवर लावतो ते देखील वाया जातात. काय केलं पाहिजे मेकअप करताना? काय लक्षात ठेवावं?

मुलींनो मेकअप नक्की करा पण ते करताना 'या' चुका टाळा!
makeup tips
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jul 13, 2023 | 12:52 PM
Share

मुंबई: सुंदर दिसणे सर्वांनाच आवडते. महिला तर यासाठी कित्येक पैसे खर्च करतात. मेकअप हा त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. कित्येक मेकअप ट्युटोरिअल्स ऑनलाइन देखील उपलब्ध असतात. मेकअप करायच्या देखील स्टेप्स आहेत. त्या फॉलो केल्या तरच मेकअप छान होतो आणि त्वचा देखील छान राहते. जर या स्टेप्स मागे पुढे झाल्या तर चेहरा खराब होऊ शकतो आणि आपण जे पैसे मेकअपच्या प्रोडक्ट्सवर लावतो ते देखील वाया जातात. काय केलं पाहिजे मेकअप करताना? काय लक्षात ठेवावं? मेकअप करताना कोणत्या चुका करू नयेत? वाचा…

अस्वच्छ मेकअप ब्रशचा वापर –

मेकअपनंतर जर तुम्ही मेकअप ब्रश किंवा स्पंज साफ केले नाही तर तुमच्या त्वचेला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या उत्पादनाच्या दीर्घकालीन वापरामुळे ब्रशमध्ये जंतू वाढू लागतात, ज्यामुळे त्वचेच्या पेशींमध्ये इन्फेक्शन होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक वापरापूर्वी मेकअप ब्रश आणि स्पंज धुवा.

त्वचेला मॉइश्चरायझर न लावणे-

मेकअप लावण्यापूर्वी त्वचेला मॉइश्चरायझ करणं खूप गरजेचं आहे. यामुळे त्वचा हायड्रेट राहते, ज्यामुळे मेकअप बराच काळ टिकून राहतो. मॉइश्चरायझिंगमुळे त्वचेवर एक थर तयार होतो जेणेकरून मेकअपमुळे तुमच्या त्वचेला हानी पोहोचणार नाही. दुसरीकडे मेकअपपूर्वी जर तुम्ही त्वचेवर मॉइश्चरायझ लावला नाही तर यामुळे तुमची त्वचा खराब होऊ शकते आणि त्वचेत अनेक समस्या उद्भवू शकतात.

मेकअप नीट न काढणे

मेकअप काढण्यासाठी अनेकजण थेट चेहरा धुतात. पण यामुळे मेकअप प्रॉडक्ट त्वचेवर राहतं, जे नंतर त्वचेला नुकसान पोहोचवतं. ज्यामुळे तुमची त्वचा खराब होते, त्यामुळे मेकअप व्यवस्थित काढण्यासाठी मेकअप रिमूव्हरचा वापर करा. याशिवाय मॉइश्चरायझर लावूनही तुम्ही चेहऱ्यावरील मेकअप काढून टाकू शकता.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा...
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा....
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक....
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून.
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात....
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात.
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ...
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ....
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला...
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध.....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध......
पोलीस भरती परीक्षेत मोठा घोटाळा? पोलीस शिपाई भरतीची रद्द झालेली लेखी..
पोलीस भरती परीक्षेत मोठा घोटाळा? पोलीस शिपाई भरतीची रद्द झालेली लेखी...
मोठी खळबळ! थेट छगन भुजबळ यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण
मोठी खळबळ! थेट छगन भुजबळ यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण.