लहान मुलांचे डोळे लाल होणे, यामागची कारणं आणि उपाय

लहान मुलांची त्वचा आणि डोळे नाजूक असतात. वर्षभराचे बाळ झालं की त्याची विशेष काळजी घेण्याची गरज असते. ते बाळ तोपर्यंत रांगायला लागतं. अनेक ठिकाणी तो वस्तूना हात लावतं. अशावेळी हाच हात त्याचा डोळाला लागतो. आणि यातून डोळ्यांना अलर्जी होण्याची भीती असते. लहान मुलांचे डोळे का लाल होतात. याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

लहान मुलांचे डोळे लाल होणे, यामागची कारणं आणि उपाय
eye
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 10:12 AM

डोळे लाल होण्याची अनेक कारणं असून शक्यतात. पण अलर्जी हे मुख्य कारण असतं. लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यामुळे त्यांना इन्फेक्शन होण्याची जास्त भीती असते. लहान मुलांना खेळताना किंवा बाहेर कुठे गेल्यावर किडा चावून डोळ्याला इजा होऊ शकते. यामुळेही डोळा लाल होतो. लहान मुलांमध्ये कंजक्टिेवाइटिस म्हणजे गुलाबी डोळे होणं ही नार्मल गोष्ट आहे. पण लहानमुलांबाबत कधीही निष्काळजीपणा नको. त्यामुळे तुम्हाला जराही डोळ्यांबद्दल शंका वाटली तर मुलांना डॉक्टरांकडे घेऊ जा. डोळ्याची घ्या काळजी डोळे लाल झाल्याने ते कोरडे होतात, सूज येते, खाज सुटते आणि काहींच्या डोळ्यातून पाणीही येतं. डोळ्याला झालेल्या इन्फेक्शनकडे कधी दुर्लक्ष करु नको. ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन डोळे तपासणे गरजेचं आहे. काही इन्फेक्शनवर घरगुती उपाय करता येतात. पण काही इन्फेक्शनसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काही करु नका.

रांजणवाडी साधारण आपल्याला डोळा येणे, पाझरू, रांजणवाडी असं काही त्रास होतात. रांजणवाडी अनेकांना होत असते. लहान मुलांना खास करुन याचा त्रास होतो. शरीरातील उष्णता वाढली की रांजणवाडी होते असं म्हटलं जातं. डोळ्याच्या वाटे ही उष्णता बाहेर पडते असं म्हणतात.

रांजणवाडी म्हणजे नेमकं काय होतं डोळ्यांच्या वरच्या किंवा खालच्या भागाला एक पुळी येते. यात पापणीच्या ग्रंथीमध्ये पू होतो. त्यामुळे डोळ्याला सूज येते. अशावेळी कोमट पाण्याने डोळा धूवा. आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डोळ्यात नियमित औषधं टाकावं.

डोळे येणे डोळे येणे हा त्रास उन्हाळ्यात जाणवतो. उन्हाळ्यात गरम हवेमुळे डोळ्यांचे अश्रू वाळतात त्यामुळे डोळ्यांना त्रास होतो. यात अचनाक डोळे लाल होतात. चिकट द्राव बाहेर पडतं राहणे, सतत डोळ्यात काहीतरी टोचल्यासारखे वाटणे, असे त्रास होतात. काही लहान मुलांना तर सर्दी होते आणि तापही येतो.

याशिवाय इतर कुठल्या कारणे डोळे लाल होतात उन्हात फिरणे धूळमातीत खेळणे सर्दी खोकला व्हायरल बॅक्टेरिया स्विमिंग पूलमधील क्लोरिन डोळ्यात गेल्याने कमी झोप सतत डोळे चोळण्याची सवय जास्त वेळ मोबाईल किंवा कॉम्प्युटर वापरणे. सध्या कोरोनामुळे मुलांची ऑनलाईन शाळा असते त्यामुळे आजकाल मुलांचा मोबाईल आणि कॉम्प्युटरवर सगळ्यात जास्त वेळ जात आहे. अशात मुलांना थंड पाण्याने डोळे धुवायची सवय लावा. डोळ्यासंदर्भात कुठलाही उपचार डॉक्टरांना न विचारता करु नका.

इतर बातम्या :

ओमिक्रॉनचा 89 देशांत शिरकाव, ब्रिटनमध्ये एकाच दिवसांत 93 हजार कोरोनाबाधित!

‘देशाच्या कुठल्याही भागात शिवछत्रपतींचा अवमान होत असेल तर या विकृतीचा निषेधच- देवेंद्र फडणवीस

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.