Bathing Tips | अंघोळ करण्याच्या ‘या’ चुकीच्या पद्धती, त्वचा आणि केसांसाठी ठरतील हानिकारक!

आपल्यापैकी अनेक लोक आंघोळ करताना अशा काही चुका करतात की, ज्यामुळे आपल्या केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.

Bathing Tips | अंघोळ करण्याच्या ‘या’ चुकीच्या पद्धती, त्वचा आणि केसांसाठी ठरतील हानिकारक!
आपल्यापैकी अनेक लोक आंघोळ करताना अशा काही चुका करतात की, ज्यामुळे आपल्या केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.
Harshada Bhirvandekar

|

Jan 30, 2021 | 11:51 AM

मुंबई : नियमित आंघोळ करणे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. दररोज आंघोळ केल्याने आपले शरीर शुद्ध होतेच, परंतु यामुळे आपल्याला त्वचेला तजेलाही मिळतो. याशिवाय आंघोळ केल्याने तुमचा दिवसभराचा थकवा ही निघून जातो. परंतु, आपल्यापैकी अनेक लोक आंघोळ करताना अशा काही चुका करतात की, ज्यामुळे आपल्या केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. तुम्ही देखील अंघोळ करताना अशा चुका करत असाल, तर वेळीच सावध व्हा. अन्यथा आपल्या केसांचे आणि त्वचेचे बरेच नुकसान होऊ शकते. चला तर, बहुतेक लोक करत असलेल्या ‘या’ सामान्य चुकांबद्दल आधी जाणून घेऊया…( Bathing tips for skin care and hair care)

भरपूर गरम पाणी

हिवाळ्यात थंडीचा कडाका वाढत असल्याने बहुतेक लोक आंघोळीसाठी जास्त गरम पाण्याचा वापर करतात. मात्र, या गरम पाण्यामुळे आपली त्वचा कोरडी पडू लागते आणि केसांचा नैसर्गिक ओलावा देखील कमी होतो.

स्काल्प घासून केस धुणे

केस धूत असताना अनेक लोक केसांना किंवा केसांच्या मुळाशी अर्थात स्काल्प अधिक जलद गतीने घासतात, ज्यामुळे केसांमध्ये खूपच गुंता निर्माण होतो. गुंतागुंत झालेले केस सोडवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. याशिवाय केसांचा गुंता सोडवताना बरेच केस तुटतात.

कंडिशनरचा वापर न करणे

जेव्हा आपण केस स्वच्छ धुवाल तेव्हा आपल्या केसांमध्ये कंडिशनर लावण्यास विसरू नका. केसांमध्ये नियमित कंडिशनर लावल्याने केस हायड्रेटेड आणि मॉइश्चराइझ राहतील. तसेच केसांचे गळणे देखील कमी होईल.

केसांसाठी व शरीरासाठी एकाच टॉवेलचा वापर

जेव्हा आपण घाईत असता तेव्हा अंग पुसण्याचा टॉवेल केस पुसण्यासाठी देखील वापरता. बॉडी टॉवेलमध्ये असलेल्या कडक फायबरमुळे तुमचे केस गळू लागतात. म्हणूनच केस पुसण्यासाठी एखादा मऊ टॉवेल वापरावा (Bathing tips for skin care and hair care).

केस नियमितपणे धुवा

प्रदूषण, उष्णता आणि बाहेरील धुळीमुळे केस नियमितपणे धुवावेत. जर, आपण वेळोवेळी केस धुतले नाहीत, तर आपले केस आणि स्काल्प खराब होऊ शकते. तसेच केसांच्या इतर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

चेहऱ्यावर साबणाचा वापर

जेव्हा आपण आपल्या चेहर्‍यावर साबण लावता, तेव्हा साबणाची पीएच पातळी त्वचेच्या समस्येस उत्तेजन देते. आपल्या त्वचेमधली रोम छिद्र खुली होतात. ज्यामुळे मुरुम आणि पिटकुळ्यांचा त्रास होतो.

फेस वॉशचा अधिक वापर

दिवसातून दोन वेळापेक्षा जास्त आपला चेहरा धुवू नका. जर चेहऱ्यावर घाण आणि तेल असेल, तरच आणखी एखाद वेळा चेहरा धुवू शकता. जर, आपण आपला चेहरा अनावश्यक असतानाही धुतला, तर त्वचेतील नैसर्गिक तेलं नष्ट होतात आणि त्वचा कोरडी दिसू लागते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Bathing tips for skin care and hair care)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें