AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाथरूम, वॉशरूम… एकाच जागेला वेगवेगळी नावे का आहेत? कारण आहे खास

Toilet Different Names: तुम्ही एकाच ठिकाणाला बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट अशी नावे ऐकली असतील. मात्र हा सर्व नावे कशी पडली याबाबत अनेकांना माहिती नाही. आज आपण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

बाथरूम, वॉशरूम... एकाच जागेला वेगवेगळी नावे का आहेत? कारण आहे खास
Washroom Different Names
| Updated on: Nov 18, 2025 | 5:47 PM
Share

तुमच्या हे लक्षात आले असेल की, टॉयलेट किंवा शौचालयाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावे वापरली जातात. काही ठिकाणी बाथरूम म्हणतात तर काही ठिकाणी वॉशरूम म्हणतात. एकाच जागेला वेगवेगळी नावे का वापरतात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र अनेकांना यामागील खरे कारण माहिती नाही. आज आपण या प्रत्येक शब्दामागील कारण काय आहे याची माहिती जाणून घेणार आहोत.

तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का? दैनंदिन जीवनात, आपण सर्वजण किमान एकदा तरी “माफ करा, शौचालय कुठे आहे?” हा प्रश्न विचारतो. पण तुम्हाला माहिती आहे का मनोरंजक काय आहे? एका लहान शौचालयाला जगभरात डझनभर नावांनी संबोधले जाते आणि प्रत्येक नावाची स्वतःची एक वेगळी कहाणी असते. ही कहाणी अशी आहे की एकाच व्यक्तीला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते… व्यावसायिक वर्तुळात एक, घरी दुसरे आणि मित्रांमध्ये दुसरे.

बाथरूम

अमेरिकेसह काही देशांमध्ये अंघोळीच्या जागेला बाथरूम असे म्हटले जात. मात्र भारतात बाथरून म्हणजे, शौचालय, बाथटब, अंघोळीची जागा असलेले ठिकाण. आपण एखाद्याच्या घरी गेल्यावर टॉयलेट कुठे आहे असं विचारत नाही, कारण हा शब्द उच्चारायला विचित्र वाटते. त्यामुळे आपण बाथरूम कुठे आहे? असं विचारतो. त्यामुळे भारतात हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरला जातो.

वॉशरूम

काही लोकांना ऑफिसमध्ये बाथरूम हा शब्द उच्चारायला आवडत नाही, त्यामुळे वॉशरूम शब्द वापरला जातो. वॉशरूममध्ये फक्त हात, चेहरा धुण्याची आणि शौचालयाची सुविधा असते. वॉशरूममध्ये अंघोळ करण्याची सुविधा नसते. हा छोटासा फरक आहे. तसेच वॉशरूम हा एक स्टायलिश शब्द आहे, त्यामुळे याचा वापर ऑफिस मॉल आणि इतर ठिकाणी केला जातो.

रेस्टरूम

1900 च्या काळात अमेरिकेतील बरेच लोक टॉयलेट हा शब्द वापरण्यास लाजत असत. त्यामुळे काही दुकानदारांनी टॉयलेटच्या दारावर रेस्टरूम असे लिहिण्यास सुरुवात केली. ज्याचा अर्थ विश्रांती असा आहे. सध्याच्या काळातही अमेरिकन मॉल आणि थिएटरमध्ये रेस्टरूम हा शब्द वापरला जातो.

लॅवेटरी

विमानांमधील टॉयलेटसाठी लॅवेटरी हा शब्द वापरला जातो. ज्याचा अर्थ हात आणि चेहरा धुण्याची जागा असा आहे. तुम्ही विमानात टॉयलेटच्या रूमवर लॅवेटरी हा शब्द नक्कीच पाहिला असेल.

पावडर रूम

18 व्या शतकात पार्ट्यांमध्ये मेकअप ठीक एक रूम तयार करण्यात आली होती, या रूमला पावडर रूम असे नाव देण्यात आलेले आहे. या रूम फक्त महिलांसाठी असतात. सध्याच्या काळात मोठ्या रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्समध्ये महिलांच्या वॉशरूमवर पावडर रूम असा शब्द लिहिलेला असतो.

Follow Us
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी...
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी....
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न...
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न....
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा...
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा....
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक....
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून.
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात....
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात.
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ...
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ....
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला...
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध.....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध......