सौंदर्य वाढवण्यासाठी ‘ही’ फुलं आहेत खुपच उपयुक्त, चमकदार त्वचा ते केसांची वाढीसाठी फायदेशीर
आपल्या घरातील बागेत उमळणारी फुलं केवळ बागेचे सौंदर्य फूलवत नाही तर ही फुलं तुमचे सौंदर्य वाढवण्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे. तर अशी काही फुलं आहेत जी तुमची त्वचा चमकदार करण्यापासुन ते केस लांब आणि मऊ करण्यासाठी त्यांचा वापर करता येतो. तर आजच्या लेखात ही फुले कोणती आहेत आणि ती कशी वापरायची? आपण जाणून घेऊयात...

बागेत तसेच घराच्या बाल्कनित उमळलेली फुले बघायला खूप सुंदर वाटतात. पण ही सुंदर दिसणारी फूलं तुम्हाला सुंदर दिसण्यासही मदत करतात. आजच्या काळात जेव्हा प्रत्येकजण कॅमिकलमुक्त आणि नैसर्गिक स्किन केअर प्रोडक्टच्या शोधात असतो, तेव्हा फुलांपासून बनवलेले हे घरगुती उपचार एक उत्तम पर्याय तुमच्या चमकदार त्वचेसाठी आणि केसांसाठी उपयुक्त ठरेल. गुलाबापासून ते झेंडू आणि चमेलीपर्यंत, अशी अनेक फुले आहेत जी त्वचेची चमक वाढवण्यास आणि केसांना बळकट करण्यास मदत करतात. असे काही प्रोडक्ट आहे ज्यात फार पूर्वी पासून फुलांचा वापर केला जात आहे, आणि आयुर्वेद व जुन्या उपायांमध्येही फुलांचे महत्त्व सांगितले गेले आहे.
महागड्या स्किन प्रोडक्टवर पैसे खर्च करण्याऐवजी जर तुम्हाला घरी काही प्रभावी आणि नैसर्गिक उपाय करायचे असतील, तर तुम्ही या फुलांपासून बनवलेले त्वचा आणि हेअर केअरची दिनचर्या नक्कीच वापरून पाहू शकता. तर आजच्या या लेखात आपण अशी कोणती फुले आहेत जी नैसर्गिक पद्धतीने तुमचे सौंदर्य वाढवू शकतात ते जाणून घेऊयात.
1. गुलाब त्वचेला नैसर्गिक चमक देतो
गुलाबाच्या पाकळ्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. त्यात असलेले अँटीऑक्सिडंट घटक त्वचेला हायड्रेट ठेवतात आणि टॅनिंग आणि पिग्मेंटेशन सारख्या समस्यांपासून आराम देतात. तर तुम्ही तुमच्या रोजच्या स्किन केअर रूटींन मध्ये टोनर म्हणून गुलाबपाणी वापरल्याने त्वचा फ्रेश आणि चमकदार दिसते. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून फेस मास्क देखील बनवू शकता.
2. रोझमेरी केसांची वाढ वाढवते
रोझमेरी हे एक हर्बल फूल आहे जे केसांची मुळे मजबूत करण्यास आणि नवीन केस येण्यास मदत करते. या फुलाच्या तेलाचा नियमित वापर केल्याने स्कॅल्पमध्ये रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे केस गळणे कमी होते. तसेच डोक्यातील कोंडा आणि खाज सुटणे यासारख्या टाळूच्या समस्या देखील दूर करते. केसांच्या मुळांना रोझमेरी पाणी किंवा तेल लावल्याने केसांची चमक वाढते.
3. केसांसाठी जास्वंदाचे फूल फायदेशीर आहे
हेअर केअर करण्यासाठी जास्वंदाचे फूल हे रामबाण औषध मानले जाते. त्यात अमीनो अॅसिड, व्हिटॅमिन ए आणि सी सारखे पोषक घटक असतात जे केसांच्या वाढीला गती देतात. जास्वंदाची पाने आणि फुले बारीक करून तुम्ही हेअर मास्क बनवू शकता ज्यामुळे केस जाड, मऊ आणि मजबूत होतात. त्याची पेस्ट त्वचेवर फेस पॅकप्रमाणे देखील लावता येते ज्यामुळे त्वचा घट्ट आणि चमकदार होते.
4. बेलाचे फूल त्वचा मऊ आणि ताजी बनवते
बेलाचे फूल केवळ सुगंधाने परिपूर्ण नाही तर त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. तर फुलांपासून ते पानांपासून बनवलेला अर्क त्वचेला हायड्रेट करतो आणि त्वचेचा रंग एकसारखा बनवतो. बेलाच्या फुलांपासून टोनर देखील बनवू शकता. हे टोनर तुम्ही त्वचेवर वापरल्याने चेहरा दिवसभर फ्रेश आणि थंड राहतो. उष्णता आणि घामामुळे होणाऱ्या जळजळ आणि पुरळांपासून देखील आराम मिळतो.
5. केस आणि त्वचा दोन्हीसाठी चमेलीचे फूल फायदेशीर आहे
चमेलीच्या फुलांमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात जे त्वचेला संसर्गापासून वाचवतात आणि चेहऱ्याचा रंग वाढवतात. तसेच केसांच्या मुळांना त्याचे तेल लावल्याने केस मजबूत आणि चमकदार होतात. यासोबतच चमेलीच्या सुगंधामुळे ताण कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे झोप सुधारते आणि त्वचेवर थेट परिणाम होतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
