AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्वचेला थंडावा आणि आराम देण्यासाठी चेहऱ्याला लावा दही काकडीचा फेस पॅक, जाणून घ्या त्याचे फायदे आणि बनवण्याची पद्धत

उन्हाळ्यात तुमची त्वचा चिकट आणि निस्तेज दिसत असेल, तर दही आणि काकडीपासून बनवलेला हा फेस पॅक तुम्हाला त्वरित आराम देऊ शकतो. तर आजच्या लेखात आपण हा फेस पॅक घरी कसा बनवायचा ते जाणून घेऊयात.

त्वचेला थंडावा आणि आराम देण्यासाठी चेहऱ्याला लावा दही काकडीचा फेस पॅक, जाणून घ्या त्याचे फायदे आणि बनवण्याची पद्धत
त्वचेला थंडावा आणि आराम देण्यासाठी चेहऱ्याला लावा दही काकडीचा फेस पॅक, जाणून घ्या त्याचे फायदे आणि बनवण्याची पद्धतImage Credit source: Freepik
| Edited By: | Updated on: May 02, 2026 | 9:41 PM
Share

उन्हाळा म्हंटल की तीव्र ऊन, घाम आणि धुळ यामुळे अनेकांची त्वचा निस्तेज आणि चिकट होऊ शकते. अशा हवामानात बरेचजण चेहरा थंड आणि ताजेतवाने ठेवण्यासाठी विविध ब्युटी प्रोडक्टचा वापर करतात, परंतु यामध्ये असलेल्या केमिकलमुळे अनेकदा त्वचेचे अधिक नुकसान होते. त्यामुळे आजकाल प्रत्येकजण हे घरगूती उपायांना पहिले प्राधान्य देत आहेत. अशातच तुम्ही त्वचेला थंड आणि आराम देण्यासाठी दही आणि काकडीचा फेस पॅक हा एक सोपा आणि नैसर्गिक उपायाचा अवलंब करू शकतात, जो त्वचेला थंडावा देऊन चमकदार बनवतो. चला तर मग आजच्या लेखात आपण हा फेसपॅक कसा बनवायचा ते जाणून घेऊयात.

दही-काकडीचा फेस पॅक त्वचेसाठी फायदेशीर का असतो?

दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते,जे त्वचेला हळुवारपणे एक्सफोलिएट करून स्वच्छ करते. तर काकडीमध्ये एक थंडाव्याचे नैसर्गिक घटक आहे जे त्वचेला आराम देते आणि दाह किंवा लालसरपणा कमी करते. त्यामुळे हे दोन्ही घटक त्वचेला आर्द्रता देतात आणि उष्णतेच्या परिणामांपासून त्वचेचं संरक्षण करण्यास मदत करतात.

हा फेस पॅक कसा बनवायचा?

हा फेस पॅक बनवायला खूप सोपा आहे. अर्धी काकडी किसून घ्या किंवा त्याची पेस्ट बनवा. त्यात 2 चमचे ताजे दही मिक्स करा. आता एकजीव पेस्ट तयार होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करा.सुगंध आणि थंडावा वाढवण्यासाठी तुम्ही या फेसपॅकमध्ये एक चमचा गुलाबपाणी मिक्स देखील करू शकता.

फेस पॅक लावण्याची योग्य पद्धत

सर्वप्रथम चेहऱ्यावरील घाण आणि तेल काढून टाकण्यासाठी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर हळुवारपणे लावा. 15 ते 20 मिनिटे फेसपॅक सुकू द्या. त्यानंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा. हा पॅक आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरल्यास उत्तम परिणाम तुम्हाला जाणवेल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा