Hair Care : केस ओले असताना ‘या’ 5 चुका करणे टाळाच, वाचा याबद्दल अधिक! 

केसांची काळजी घेणे सोपे काम नाही. खराब हवामान, प्रदूषण आणि व्यस्त जीवनशैलीमुळे केसांच्या वाढीवरही परिणाम होतो. ज्यामुळे बरेच लोक केस गळण्याच्या समस्येने त्रस्त असतात. यामागे अनेक कारणे असू शकतात. याशिवाय, आपल्या छोट्या चुकांमुळे केस देखील खराब होतात.

Hair Care : केस ओले असताना 'या' 5 चुका करणे टाळाच, वाचा याबद्दल अधिक! 
केसांची काळजी

मुंबई : केसांची काळजी घेणे सोपे काम नाही. खराब हवामान, प्रदूषण आणि व्यस्त जीवनशैलीमुळे केसांच्या वाढीवरही परिणाम होतो. ज्यामुळे बरेच लोक केस गळण्याच्या समस्येने त्रस्त असतात. यामागे अनेक कारणे असू शकतात. याशिवाय, आपल्या छोट्या चुकांमुळे केस देखील खराब होतात. बरेच लोक ओले केस विंचरतात. आपल्या सर्वांना माहित आहे की ओले केस खूप कमकुवत असतात. अशा परिस्थितीत आपण अनेक सामान्य चुका करतो, ज्यामुळे केस खराब होतात.

1. ओले केस विंचरणे

बरेच लोक ओले केस विंचरण्याची चूक करतात. केस पूर्णपणे ओले झाल्यावर बहुतेक लोक विंचरतात. वास्तविक ओल्या केसांना विंचरल्याने केसांचे नुकसान होते. आपले केस पूर्णपणे सुकेपर्यंत विंचरू नका. केस विंचरण्यासाठी तुम्ही रुंद कंगवा वापरू शकता.

2. ओले केस बांधणे

शॉवर घेतल्यानंतर आपण अनेकदा आपले केस बांधतो. कधीकधी आपण हे घाईत करतो. आपल्या सर्वांना माहित आहे की ओले केस कमकुवत असतात. ओले केस बांधल्याने नुकसान होते. म्हणूनच तुम्ही नेहमी अशी चूक करणे टाळा.

3. ओले केस आणि टाॅवेल

केस सुकविण्यासाठी अनेकदा ओल्या केसांमध्ये टॉवेल गुंडाळला जातो. ही चूक करू नका. यामुळे केस जास्त तुटतात आणि गुंतागुंतही होते. केस सुकवण्यासाठी तुम्ही मऊ कापड वापरू शकता.

4. ओल्या केसांवर हीटिंग

आपल्या सर्वांना आपले केस स्टाईल करायला आवडतात. पण ही चूक ओल्या केसांमध्ये करू नये. त्यातून निघणारी उष्णता केसांना हानी पोहोचवू शकते. स्टाईलिंग साधनांचा वापर केल्याने केसांचेही नुकसान होते आणि ओल्या केसांवर वापरल्याने अधिक नुकसान होते.

5. ओल्या केसांमध्ये झोपणे

बऱ्याच वेळा रात्री केस धुतले जातात आणि ओल्या केसांमध्ये झोपले जाते. यामुळे केसांना जास्त नुकसान होते. उशी आणि केसांमध्ये घर्षण झाल्यामुळे केसांना जास्त नुकसान होते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Avoid making these 5 mistakes while your hair is wet)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI