AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : केळी, दही आणि हळदीचा फेसपॅक लावा, त्वचा उजळवा

निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात.

Skin Care : केळी, दही आणि हळदीचा फेसपॅक लावा, त्वचा उजळवा
सुंदर त्वचा
| Edited By: Anish Bendre | Updated on: May 31, 2021 | 8:30 AM
Share

मुंबई : निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतो. परंतु, आपणास माहित आहे का की, या महागड्या उत्पादनांऐवजी काही चांगल्या सवयींचा अवलंब करून देखील आपण निरोगी त्वचा मिळवू शकता. या सवयींचा अवलंब केल्याने त्वचा सुधारण्यास सुरुवात होते. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आपण शक्यतो घरगुती उपायांचा अवलंब केला पाहिजे. यामुळे आपली त्वचा सुंदर आणि तजेलदार होते. (Banana, Curd and turmeric face pack are beneficial for the skin)

आपली त्वचा निरोगी आणि चमकदार दिसण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही एक खास फेसपॅक सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची त्वचा सुंदर होईल. हा फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला एक केळी, एक वाटी दही आणि हळद लागणार आहे. सर्वात अगोदर केळी बारीक करून घ्या आणि त्यामध्ये दही मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा. त्यानंतर शेवटी त्या पेस्टमध्ये हळद मिक्स करा. ही पेस्ट दहा मिनिटे तशीच ठेवा आणि संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. साधारण वीस मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा.

ही पेस्ट आपण आठवड्यातून तीन ते चार वेळा आपल्या चेहऱ्याला लावली पाहिजे. दह्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. जे सर्नबर्न आणि टॅनिंगची समस्या दूर करण्यासाठी उपयोगी ठरते. सन बर्न कमी करण्यासाठी त्वचेवर दही लावा आणि 15 मिनिटांनंतर त्वचा साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. टॅनिंग काढून टाकण्यासाठी दह्यामध्ये 7 ते 8 चमचे बेसनाचे पीठ आणि लिंबाचा रस आणि मध घाला. ही पेस्ट टॅन झालेल्या भागावर लावा आणि काही वेळ कोरडी होऊ द्या. त्यानंतर थंड पाण्याने त्वचा धुवा. हे आठवड्यातून दोन वेळा त्वचेला लावले पाहिजे.

केळी खाणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, केळी खाणे जेवढे आपल्या आरोग्यासाठी जेवढे चांगले आहे त्यापेक्षाही अधिक आपल्या त्वचेसाठी केळी फायदेशीर आहे. केळीमध्ये पोटॅशियम, मूड-रेगुलेटिंग फोलेट, ट्रायटोफन आणि एनर्जाइजिंग कार्ब्स देखील असतात. केळीमध्ये पोटॅशियम, मूड-रेगुलेटिंग फोलेट, ट्रायटोफन आणि एनर्जाइजिंग कार्ब्स देखील असतात. केळी पोटॅशियमने समृद्ध आहेत. केळी आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करतात आणि शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते.

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

(Banana, Curd and turmeric face pack are beneficial for the skin)

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ