Skin Care : बेसन आणि हळदीचा फेसपॅक घरी तयार करा आणि चेहऱ्यावर पार्लरसारखा ग्लो मिळवा!

सणासुदीच्या काळात सुंदर आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी आपण पार्लरमध्ये जातो. मात्र, अनेक वेळा कामाच्या धावपळीत आपल्याला पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नाही. अशावेळी आपण काही घरगुती उपाय करून पार्लरसारखा ग्लो त्वचेवर मिळू शकता.

Skin Care : बेसन आणि हळदीचा फेसपॅक घरी तयार करा आणि चेहऱ्यावर पार्लरसारखा ग्लो मिळवा!
त्वचा
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 9:25 AM

मुंबई : सणासुदीच्या काळात सुंदर आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी आपण पार्लरमध्ये जातो. मात्र, अनेक वेळा कामाच्या धावपळीत आपल्याला पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नाही. अशावेळी आपण काही घरगुती उपाय करून पार्लरसारखा ग्लो त्वचेवर मिळू शकता. यासाठी आपण घरचे-घरी बेसन आणि हळदीचा फेसपॅक तयार करू शकता. विशेष म्हणजे हा फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ देखील लागत नाही.

हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला चार चमचे बेसन पीठ, दोन चमचे गुलाब पाणी आणि अर्धा चमचा हळद लागणार आहे. हळद, बेसन आणि गुलाब पाणी चांगले मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. या पॅकमुळे आपली त्वचा तजेलदार आणि सुंदर दिसेल.

केळी आणि गुलाब पाण्याचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हा फेसपॅक वापरल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. विशेष म्हणजे हा पॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला जास्त वेळही लागत नाही. हा पॅक तयार करण्यासाठी एक केळी आणि पाच चमचे गुलाब पाणी घ्या. त्यानंतर याची चांगली पेस्ट तयार करा आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर वीस मिनिटे ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने आपला चेहऱा धुवा.

दही त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. ते तुमच्या त्वचेचे अतिरिक्त तेल कमी करू शकते. दही आणि बेसन मिक्स करून पेस्ट बनवा. हा फेसपॅक बनवण्यासाठी 2 मोठे बेसन चमचे मिसळून त्यात एक चमचा दही घाला. ही पेस्ट लावल्याने पिंपल्स आणि मुरुमांची समस्या कमी होते. या पेस्टमध्ये एक चिमूटभर हळद घाला. हळदीमध्ये नैसर्गिक गुणधर्म आहेत. जे मुरुमांच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करतात. दही त्वचेच्या छिद्रांना बाहेर काढण्यास मदत करते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Besan and turmeric face pack are beneficial for the skin)

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.