AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : चमकदार त्वचा मिळवण्यासाठी कॉफीचा वापर करा, त्याचे फायदे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल!

कॉफी (Coffee) फक्त तुम्हाला ताजेतवाने ठेवण्यास मदत करत नाही तर ती तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात असतात. जे त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, ते कोलेजन वाढवते. कॉफीचा वापर त्वचेला चमकदार करण्यासाठी केला जाऊ शकतो. तुम्ही कॉफीचा स्क्रब, फेस मास्क म्हणून वापर करू शकता.

Skin Care : चमकदार त्वचा मिळवण्यासाठी कॉफीचा वापर करा, त्याचे फायदे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल!
फेसपॅक
| Edited By: | Updated on: Oct 04, 2021 | 8:00 AM
Share

मुंबई : कॉफी (Coffee) फक्त तुम्हाला ताजेतवाने ठेवण्यास मदत करत नाही तर ती तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात असतात. जे त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, ते कोलेजन वाढवते. कॉफीचा वापर त्वचेला चमकदार करण्यासाठी केला जाऊ शकतो. तुम्ही कॉफीचा स्क्रब, फेस मास्क म्हणून वापर करू शकता. हे त्वचेतील चमक टिकवून ठेवण्यास मदत करते. (Coffee is extremely beneficial for getting glowing skin)

कॉफीचे फायदे

1. वृद्धत्व विरोधी गुणधर्म

कॉफीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात. जे त्वचेच्या खराब झालेल्या पेशी दुरुस्त करण्यास मदत करतात. हे तुमच्या त्वचेला लालसरपणा, सूक्ष्म रेषा आणि सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवण्याचे काम करते.

2. सेल्युलाईट कमी करते

कॉफीमध्ये कॅफीन असते. जे रक्त प्रवाह वाढवण्यास मदत करते. यामुळे सेल्युलाईटचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होते.

3. त्वचा कर्करोग प्रतिबंधित करते

कॉफीमध्ये व्हिटॅमिन बी -3 असते. जे त्वचेच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करते. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी कॉफी स्क्रब आणि मास्क वापरा.

4. मुरुमाची समस्या दूर होते

कॉफी हे कोलोजेनिक अॅसिडचा मुख्य स्त्रोत आहे. ज्यात बॅक्टेरियाविरोधी आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. हे त्वचेचे संक्रमण आणि मुरुमापासून मुक्त होण्यास मदत करते. आपण कॉफी एक्सफोलिएटिंग एजंट म्हणून वापरू शकता.

कॉफीचे घरगुती उपाय

1. कॉफी आणि ऑलिव्ह ऑईल मास्क

डोळ्यांची सूज आणि काळी वर्तुळे कमी करण्यासाठी तुम्ही कॉफी मास्क वापरू शकता. यासाठी अर्धा चमचे कॉफीमध्ये थोडे ऑलिव्ह ऑइल मिसळा आणि काही थेंब पाणी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट डोळ्यांभोवती लावा आणि सुमारे 10 मिनिटे सोडा आणि नंतर पाण्याने धुवा.

2. कॉफी आणि मध मास्क

कॉफीचा वापर त्वचेला मॉइश्चराइझ ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला 2 चमचे कॉफीमध्ये एक चमचा मध मिसळावा लागेल. या दोन गोष्टी चांगल्या प्रकारे मिसळून पेस्ट बनवा आणि 15 मिनिटे सोडा. यानंतर कोमट पाण्याने धुवून नंतर चेहरा सुकवा.

3. कॉफी, दही आणि हळद

मुरुमापासून मुक्त होण्यासाठी कॉफीचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला दोन चमचे कॉफीमध्ये दोन चमचे दही आणि एक चमचा हळद मिसळावी लागेल. हे मिश्रण 10 मिनिटे ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. हे मिश्रण वापरून तुम्ही त्वचा ताजी आणि चमकदार ठेवू शकता.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Coffee is extremely beneficial for getting glowing skin)

सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.