AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair Care Tips : हिवाळ्यात कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा!

कोंडा ही केसांची सामान्य समस्या आहे. हिवाळ्यात हा त्रास वाढतो. काही वेळा हार्ड शॅम्पूच्या वापरामुळेही ही समस्या उद्भवते. यामुळे डोक्यावर पांढरा थर साचतो, ज्यामुळे खाज येण्याची समस्या निर्माण होते, तसेच केसांची मुळे कमकुवत होतात.

Hair Care Tips : हिवाळ्यात कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय नक्की करा!
केस
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Nov 12, 2021 | 7:10 AM
Share

मुंबई : कोंडा ही केसांची सामान्य समस्या आहे. हिवाळ्यात हा त्रास वाढतो. काही वेळा हार्ड शॅम्पूच्या वापरामुळेही ही समस्या उद्भवते. यामुळे डोक्यावर पांढरा थर साचतो, ज्यामुळे खाज येण्याची समस्या निर्माण होते, तसेच केसांची मुळे कमकुवत होतात. त्यामुळे केस तेलकट आणि चिकट राहतात. कोंड्याची समस्या टाळण्यासाठी आपण काही घरगुती उपाय नेहमी केले पाहिजेत.

कडुलिंबाची पाने

कडुलिंबाच्या पानांमध्ये नैसर्गिक बुरशीनाशक आणि जंतुनाशक गुणधर्म असतात. ते बारीक करून दह्यात मिसळून केसांना लावा. आठवड्यातून दोनदा असे केल्याने कोंड्याची समस्या बर्‍याच प्रमाणात दूर होते. तुम्ही त्याची पेस्ट बनवून दह्याशिवाय लावू शकता. याशिवाय डोक्याला कडुलिंबाच्या तेलाने मसाज करणेही खूप फायदेशीर मानले जाते.

खोबरेल तेल

खोबऱ्याच्या तेलात लॉरिक ऍसिड आढळते. एका भांड्यात खोबरेल तेलात कापूर मिसळा आणि अर्धा लिंबू पिळून घ्या. नीट मिसळल्यानंतर डोक्याला लावा. यामुळे कोंड्याची समस्या काही दिवसातच दूर होते.

टी ट्री ऑइल

टी ट्री ऑइलमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आढळतात. खोबरेल तेल किंवा तिळाच्या तेलात मिसळून लावल्याने कोंड्याची समस्या काही वेळातच दूर होते.

सफरचंद व्हिनेगर

सफरचंद व्हिनेगर देखील ही समस्या दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते. यासाठी तुम्ही एक स्प्रे बाटली घ्या आणि त्यात एक कप पाणी आणि अर्धा कप सफरचंद सायडर व्हिनेगर घाला. मुळांवर फवारणी करावी. तुम्हाला हवे असल्यास ते केसांवर रात्रभर राहू द्या. सकाळी केस धुवा. असे केल्याने ही समस्या काही दिवसातच दूर होते.

लिंबू आणि मध

मधात लिंबू पिळून चांगले मिसळा आणि मुळांवर लावा. काही वेळ असेच राहू द्या, त्यानंतर सामान्य पाण्याने डोके धुवा. लिंबूमध्ये नैसर्गिक आम्ल असते जे कोंडा दूर करते आणि मध कोरडेपणा दूर करण्यास मदत करते.

संबंधित बातम्या : 

Make Up Tips | मेकअप लावल्याने चेहऱ्यावर डाग पडतायत? मग वापरा ‘या’ सोप्या टिप्स…

एकदा उकळवलेले दूध पुन्हा उकळवण्याची चूक करताय? होऊ शकते मोठे नुकसान!

(Do this home remedy to get rid of dandruff in winter)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?