प्रथिनेयुक्त आहार घ्या आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा !

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Apr 18, 2021 | 1:38 PM

प्रथिने आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाची असतात. हे आपली पाचक प्रणाली मजबूत ठेवते.

प्रथिनेयुक्त आहार घ्या आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा !
Follow us

मुंबई : प्रथिने आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाची असतात. हे आपली पाचक प्रणाली मजबूत ठेवते. तसेच आपली प्रतिकारशक्ती मजबूत करते. हे आपल्या त्वचेच्या पेशी आणि शरीराच्या पेशी तयार करतात. मांसाहारी आणि शाकाहारी अशा दोन्ही प्रकारच्या खाद्यपदार्थापासून प्रथिने आपल्या शरीराला मिळतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. नेमक्या कोणत्या पदार्थांमधून आपल्या शरीराला जास्त प्रमाणात प्रथिने मिळतात. (A protein diet is beneficial for boosting the immune system)

बदामाचे सेवन – बदाम खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. दररोज बदामाचे सेवन केल्याने आपल्याला प्रथिने मिळतात. याशिवाय यामध्ये चरबी, जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील आहेत. दररोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम खाणे चांगले असते. रात्री बदाम भिजवावे आणि सकाळी खावे. दररोज बदाम खाल्ल्याने आरोग्यामध्ये चांगले फायदे होतात.

राजमा – राजमामध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. राजमाची भाजी तयार करून आपण खाऊ शकतो. तसेच सूपमध्ये देखील राजमा मिक्य करू शकतो. राजमा खाल्ल्याने तुमच्या शरीरातील प्रथिन्यांची पातळी चांगली राहते. रात्री राजमा पाण्यात भिजवून सकाळी आपण खाऊ शकतो.

दूध – दूध हे बर्‍याच पोषक तत्वांचे भांडार आहे आणि भारतात दूध हा रोजच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. दुधात आढळणारे कार्ब, प्रथिने आणि चरबी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, म्हणून प्रत्येकाचाच दूध पिण्यावर भर दिला पाहिजे.

पनीर- पनीरमध्ये प्रथिने भरपूर असतात. तुम्ही बाजारातून पनीर घेऊ शकता किंवा घरीही बनवू शकता. आपण पराठे, भुजिया आणि पुलाव सह देखील पनीर खाऊ शकता.

पालक- पालक लोहासारख्या पौष्टिक घटकांनी समृद्ध आहे. त्यात प्रथिनेही असतात. आपण पराठे, भाज्या, मसूर आणि खिचडी इत्यादीमध्ये पालक वापरू शकता.

ब्रोकोली- ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फायबर आणि पोटॅशियम इत्यादी पोषक घटक असतात. त्यात कमी प्रमाणात कॅलरी असतात. लोक वजन कमी करण्यासाठी ब्रोकोली खातात. यामधून तुम्हाला भरपूर प्रोटीन देखील मिळते.

डाळ – डाळ प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. मूग, मसूर, हरभरा आणि उडीद अशा अनेक प्रकारच्या डाळीमध्ये उच्च प्रथिने असतात. आपण दररोज आहारामध्ये डाळ देखील समाविष्ट करू शकता.

संबंधित बातम्या : 

Make Up Tips | मेकअप लावल्याने चेहऱ्यावर डाग पडतायत? मग वापरा ‘या’ सोप्या टिप्स…

(A protein diet is beneficial for boosting the immune system)

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI