AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : दररोज सकाळी 1 टोमॅटो खा आणि वृद्धत्वाची लक्षणे दूर करा!

टोमॅटो खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. जवळपास सर्व भाज्यांमध्ये आपण टोमॅटोचा समावेश करतो. टोमॅटो खाल्ल्याने अनेक रोग आपल्यापासून दूर राहतात.

Skin Care : दररोज सकाळी 1 टोमॅटो खा आणि वृद्धत्वाची लक्षणे दूर करा!
टोमॅटो
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 08, 2021 | 7:34 AM
Share

मुंबई : टोमॅटो खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. जवळपास सर्व भाज्यांमध्ये आपण टोमॅटोचा समावेश करतो. टोमॅटो खाल्ल्याने अनेक रोग आपल्यापासून दूर राहतात. टोमॅटोमध्ये व्हिटामिन सी, लाइकोपीन आणि पोटॅशियम हे घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. टोमॅटो हे चवीला काहीसे आंबट असतात, कारण यामध्ये सायटीक अॅसिड असते. याशिवाय टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटामिन्स, मिनरल्स आणि फायबरची मात्राही भरपूर असते.(Eat 1 tomato daily and eliminate the symptoms of aging)

बदललेल्या जीवनशैलीमध्ये आपल्या आरोग्याच्या समस्येसोबतच आपल्या त्वचेच्याही समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. कारण सध्याच्या धावपळीचा आयुष्यामध्ये आपण आरोग्याकडे आणि त्वचेकडे लक्ष देऊ शकत नाहीत. यामुळे अगदी कमी वयातच आपले केस पांढरे होणे आणि चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी जवळपास सर्वचजण प्रयत्न करताना दिसत आहे.

आपण जर दररोज सकाळी एक टोमॅटो खाल्ले तर आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि वृद्धत्वाची लक्षणे दूर होण्यास नक्की मदत होईल. यासाठी आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक टोमॅटो खाल्ले पाहिजेत. टोमॅटोमध्ये पोटॅशिअम आणि मँगनीज भरपूर प्रमाणात असते. तसंच टोमॅटो कॅल्शिअम, आर्यन, कॉपर, मॅग्नेशिअम, फॉस्फरस आणि झिंक यासारख्या तत्त्वांनी युक्त असतो. टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणही आढळतात, मॅटोमधील लाल रंग हा त्यातील लाइकोपीनमुळे प्राप्त होतो, जे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे.

याच कारणामुळे कच्चा टोमॅटो पिकल्यानंतर अजून प्रभावकारक ठरतो. मॅटोमध्ये कर्बोदकाचे प्रमाण अत्यंत कमी असते. हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह या विकारांमध्ये टोमॅटो गुणकारी आहे. वजन कमी करायचे असेल तर टोमॅटो खाणे खूप फायदेशीर आहे. आपण एक टोमॅटो खाल्ले तर बऱ्याच वेळ भूक लागत नाही आणि पोट भरल्यासारखे वाटते. वजन कमी करायचे आहे अशांनी दररोज सकाळी टोमॅटो खाल्ले पाहिजे. व्हिटामिन एची मात्रा असल्याने टोमॅटो डोळ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Eat 1 tomato daily and eliminate the symptoms of aging)

Follow Us
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना दिलासा!
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! सारथी शिष्यवृत्तीवरील खर्च मर्यादेवर मोठा निर्णय
मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष
Thackeray Group Dahihandi | मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष बघाच
जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत आंदोलकांची मोठी गर्दी
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह बघाच
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह; मध्यरात्री बाळकृष्णाचा जन्मसोहळा, मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी